Top Newsस्पोर्ट्स

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाजीत मनीष नरवालला ‘सुवर्ण’, तर सिंघराजला ‘रौप्य’ पदक

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतानं नेमबाजीत आणखी दोन पदकांची कमाई केली आहे. भारताच्या १९ वर्षीय मनीष नरवाल यानं पुरुषांच्या मिक्स ५० मीटर पिस्तल प्रकारात सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. तर याच स्पर्धेचं रौप्य पदक देखील भारताच्याच खात्यात जमा झालं आहे. सिंघराज अधाना यानं रौप्य पदकावर नाव कोरलं आहे. मनीष आणि सिंघराज यांच्यात सुवर्ण पदकासाठी कडवी टक्कर पाहायला मिळाली. यात १९ वर्षीय मनीष नरवाल यानं बाजी मारली आणि टोकियो पॅरालिम्पिकमध्ये त्यानं भारताला तिसरं सुवर्ण पदक मिळवून दिलं.

मनीष नरवाल यानं स्पर्धेची सुरुवातच धमाकेदार केली होती. स्पर्धा सुरू असताना एक वेळ अशी देखील आली की तो सहाव्या क्रमांकापर्यंत घसरला होता. त्यानंतर दमदार पुनरागमन करत अचूक वेध घेत सुवर्ण पदकावर नाव कोरलं. दुसऱ्या बाजूनं ३९ वर्षीय सिंघराज स्पर्धेत सुरुवातीपासूनच टॉप-३ मध्ये कायम होते.

बॅडमिंटनमध्ये प्रमोद भगत ‘सुवर्ण’, तर मनोज सरकार ‘ब्राँझ’साठी खेळणार

टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत नेमबाजी आणि अ‍ॅथलिटिक्समध्ये पदकांची लयलूट केल्यानंतर भारतानं आता बॅडमिंटनमध्येही पदक निश्चित केलं आहे. भारताचा स्टार बॅडमिंटनपटू प्रमोद भगत यानं अंतिम फेरीत प्रवेश केला असून सुवर्ण पदकापासून तो आता फक्त एक पाऊल दूर आहे. त्यामुळे भारताचं बॅडमिंटनमधलं एक पदक निश्चित झालं आहे. अंतिम फेरीत प्रमोद भगतनं विजयी कामगिरी केली तर सुवर्ण पदक भारताच्या खात्यात जमा होईल आणि पराभवाला समोरं जावं लागलं तरी रौप्य पदक निश्चित झालं आहे. वर्ल्ड नंबर वन प्रमोद भगत यानं सेमिफायनलमध्ये जपानच्या स्पर्धकाला मात देत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. जपानच्या फुजीहारा याच्यावर २१-११, २१-१६ अशा सरळ सेटमध्ये विजय प्राप्त केला.

सेमीफायनलमध्ये प्रमोद भगत यानं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. पहिल्या दोन गेममध्ये अडखळत सुरुवात झाली होती. पण त्यानंतर प्रमोद भगत यानं संपूर्ण सामन्यावर अखेरपर्यंत पकड कायम ठेवली आणि फायनलमध्ये समावेश केला. प्रमोद भगत फायनलमध्ये दाखल होताच भारताच्या खात्यात १४ वं मेडल निश्चित झालं आहे.

सेमीफायनलमध्ये भारताच्या मनोज सरकार याला ग्रेट ब्रिटनच्या स्पर्धकाविरुद्ध पराभवाला सामोरं जावं लागलं. सेमीफायनलमध्ये मनोज सरकारच्या पराभव झालेला असला तरी कांस्य पदकाची आशा अजूनही कायम आहे. प्रमोद भगतविरुद्ध पराभूत झालेल्या जपानी स्पर्धकाविरुद्ध मनोज सरकारला याला विजय प्राप्त करुन कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. तर प्रमोद भगत याचा सुवर्णपदकासाठीचा सामना ग्रेट ब्रिटनच्या डॅनियल बेथहेल विरुद्ध होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button