
नवी दिल्ली : दिल्लीमध्ये शनिवारी सकाळी रेकॉर्डब्रेक पाऊस पडला असून त्यामुळे दिल्लीतील रस्तेच नव्हे तर देशातलं सर्वात उत्तम विमानतळ समजल्या जाणारे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ पाण्यात गेल्याचं दिसून येतंय. दिल्ली विमानतळाची धावपट्टीच नव्हे तर विमानतळाच्या आतमध्येही पाणी साचलं असून त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
दिल्ली विमानतळाचे व्यवस्थापन हे जीएमआर या खासगी संस्थेकडे आहे. या विमानतळावर गेल्यानंतर आपल्याला दिल्ली विमानतळ हे देशातील सर्वोत्तम विमानतळ असल्याचे बोर्ड पहायला मिळतात. आता याच विमानतळावर सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे उत्तम व्यवस्थापनेचा दावा करणाऱ्या जीएमआर कंपनीचा दावा किती फोल ठरला आहे हे दिसून येतंय. अचानक आलेल्या पावसामुळे विमानतळावर पाणी साचलं असून प्रवाशांना झालेल्या तसदीबद्दल खेद व्यक्त करत आहोत असं दिल्ली विमानतळाच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केलं. थोड्याच वेळात पाणी बाहेर काढण्यात येईल असंही आश्वासन व्यवस्थापनाने दिलं आहे.
#WATCH | Parts of Delhi Airport waterlogged following heavy rainfall in the national capital; visuals from Indira Gandhi International Airport (Terminal 3) pic.twitter.com/DIfUn8tMei
— ANI (@ANI) September 11, 2021
दिल्लीत गेल्या ४५ वर्षातील रेकॉर्डब्रेक पाऊस पडल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे दिल्लीचे जनजीवन विस्कळीत झालं असून शहरातल्या रस्त्यावर पाणीच पाणी झाल्याचं दिसून येतंय.
Due to heavy downpour passengers encountered waterlogging for a short while. The on-ground team was immediately mobilized and the operations are back to normal since 9 am.@JM_Scindia @MoCA_GoI pic.twitter.com/1lcLxjo9a6
— Delhi Airport (@DelhiAirport) September 11, 2021




