Top Newsराजकारण

वाद व्हायचे, पण सुसंवाद होता; आता कोथळा काढायची भाषा होते… : शरद पवार

मुंबई : मृणालताई गोरे सदनामध्ये अनेकवेळा वाद झालेत परंतु ते राज्याच्या हिताचे असायचे. त्यावेळी सुसंवाद पाहायला मिळायचा, तो सुसंवाद आता मिळत नाही. आता कोथळा काढायची भाषा केली जाते असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. शरद पवार मृणालताई गोरे दालनाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते. शरद पवारांच्या हस्ते या दालनाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी शरद पवार यांनी मृणालताई गोरे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. समाजवादी चळवळीतील मृणालताई गोरे नावाच्या झंझावाताचा कलाविष्कार त्यांच्या संघर्षमय प्रवासाची ओळख दाखवणारा व नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल असे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

यावेळी शरद पवार यांनी म्हटलं आहे की, मृणालताई गोरे सदनामध्ये अनेकवेळा वाद व्हायचे, परंतु ते राज्याच्या हिताचे होते. यामध्ये सुसंवादही पाहायला मिळायचा, मात्र आता सुसंवाद पाहायला मिळत नाही असे शरद पवार यांनी कार्यक्रमात म्हटलं आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात अनेकांनी प्रचंड योगदान दिलंय. त्यात अनेकांची आठवण येते. आठवण आल्यावर प्रकर्षाने त्यात मृणालताईंची आठवण आल्याशिवाय राहत नाही असे शरद पवार यांनी म्हटलं आहे. गोरेगावातील केशवराव गोरे स्मारक ट्रस्टच्या इमारतीत समाजवादी चळवळीतील मृणालताई गोरे नावाच्या झंझावाताचा कलाविष्कार त्यांच्या संघर्षमय प्रवासाची ओळख दाखवणारा व नव्या पिढीला प्रेरणा देणारा ठरेल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला आहे. वैद्यकीय शिक्षण सोडून देऊन सामाजिक रोगावर उपचार करण्यासाठी चूलघरातील लाटणे, हंडे आणि थाळ्यांसारखी हत्यारे हाती घेऊन संघर्ष उभा करणाऱ्या मृणालताईंना कलादालनाच्या रूपाने दिलेली ही खरी श्रद्धांजली असल्याचे शरद पवारांनी म्हटल आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button