
नाशिकः एकीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा दिशा सालियनच्या मृत्यूच्या प्रकरणावरून महाविकास आघाडी विशेषतः मुख्यमंत्र्यांना घेरण्याचा प्रयत्न केला. दुसरीकडे भुजबळांप्रमाणेच मातोश्रीचे गुन्हे आहेत. भुजबळ आत गेले. मातोश्रीचीही रसद वरती पोहचवल्याचे सांगितले. त्याला नाशिकमध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी तुफान टोलेबाजी करत आपल्या शैलीत उत्तर दिले. भुजबळ म्हणाले, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आनंदाचे वातावरण आहे. आज पत्रकार परिषद झाली नसती, तर बरं झालं असतं. मात्र, असो म्हणत त्यांनी काँग्रेस सोडून काही लोक भाजपमध्ये का गेले? पब्लिक सब जानती है, म्हणत नारायण राणे यांना जोरदार टोला हाणला. त्यामुळे येणाऱ्या काळात या पत्रकार परिषदा आणि आरोप-प्रत्यारोप सुरूच राहणार आहेत.
नारायण राणे यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्र्यांवर टीका केली. भुजबळांसारखेच मातोश्रींवर आरोप आहेत. भुजबळ आत गेले अडीच वर्ष. तसेच गुन्हे मातोश्रीचे आहेत. त्याची माहिती मी पोहोचती केल्याचे सांगितले. दोघांचाही सीए एकच आहे, असा दावा केला. शिवाय जुहू येथील माझ्या घरात मी एका इंचाचंही बेकायदा बांधकाम केलं नाही. मला बेकायदा बांधकाम करण्याची गरज पडली नाही. माझी इमारत शंभर टक्के कायदेशीर आहे. असा दावा केला. त्यानंतर दिशा सालियनवर बलात्कार कोणी केला, सुशांतसिंगच्या इमारतीचे सीसीटीव्ही कॅमेरे गायब कसे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. हे सारे सुशांत सिंगला जेव्हा कळलं, तेव्हा तो म्हणाला मै इनको छोडूंगा नही. त्यानंतर काही लोक त्याच्या घरी गेले. त्याच्या घरात दिशावरून बाचाबाची झाली. त्यात त्याची हत्या केली गेली. तेव्हा कोणत्या मंत्र्यांची गाडी होती. त्याच्या इमारतीतील सीसीटीव्ही कॅमेरे गायब कुठे झाले. १३13 जूनला गायब झाले, असा दावाही त्यांनी केला.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आरोपाला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले की, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. आनंदाचे वातावरण आहे. आज पत्रकार परिषद झाली नसती, तर बरं झालं असतं. मात्र, असो. मातोश्रीवरच्या आरोपांच्या संबंधाने भुजबळ म्हणाले की, तशी परिस्थिती नाही. त्यांचे आणि माझे सीए वेगळे आहेत. त्यांच्या सीएचा आमच्या सीएशी संबंध नाही. आजकाल कारवाई करताना मटेरिअल महत्वाचे नाही. दिल्लीवरून आदेश आला की, नसलं तरी कारवाई होते. काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक आपल्या पार्टीत येणार म्हटल्यावर, इनको छोड दो असा उलटा संदेश येतो, असा दावा त्यांनी केला.
भुजबळ म्हणाले की, एक दोन माणसं अख्ख्या राज्यात आरोप करत फिरत होते. त्याला संजय राऊत यांनी कणखर उत्तर दिलं. काँग्रेस सोडून काही लोक भाजपात का गेले, हे सगळ्यांना माहिती आहे. पब्लिक सब जानती है, असा टोलाही त्यांनी यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता हाणला.