आरोग्य
देशात बाधितांसह कोरोनाबळींच्या संख्येतही घट
नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत मोठी घट झाली आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांच्या आकड्यात घट झाली आहे. आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत तब्बल १७ हजारांनी घट झाली आहे. कालच्या दिवसात २ लाख ४० हजार ८४२ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. मोठ्या कालावधीनंतर एका दिवसातील रुग्णसंख्या अडीच लाखांच्या खाली आली. कालच्या दिवसात ३ हजार ७४१ कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आणि कोरोनाबळींच्या संख्येत घट झाल्याने मोठा दिलासा मानला जात आहे.
गेल्या २४ तासात भारतात २ लाख ४० हजार ८४२ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ३ हजार ७४१ रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात ३ लाख ५५ हजार १०२ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.