राजकारण

भाजप कार्यालयावरील मोर्चाचा युवक काँग्रेसचा डाव उधळला; मंगल प्रभात लोढा यांचा इशारा

मुंबई : युवक काँग्रेसच्या मोर्चावरून मुंबईत भाजप आणि काँग्रेस पुन्हा आमनेसामने आले आहेत. टिपू सुलतानाच्या औलादांनी भाजपवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना त्याच पद्धतीनं उत्तर देऊ, आम्ही संघर्ष करणारी लोक असून भाजपाच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असाल. तसेच भाजप कार्यकर्त्यांना डिवचण्याचा प्रयत्न कराल तर जशास तसे उत्तर देऊ असा इशारा मुंबई भाजपा अध्यक्ष मंगल प्रभात लोढा यांनी युवक काँग्रेस आंदोलक आमदार झिशान सिद्दीकी यांना दिला.

पेगासस प्रकरणाबाबत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दादर येथील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयावर मोर्चा काढण्याचा घाट घातला होता. युवक काँग्रेसचा हा डाव मुंबई भाजपा ने उधळून लावला. मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली मुंबई भाजपाने युवक काँग्रेस विरोधात आंदोलनाचा पवित्रा उचलला. ‘दाऊद की औलादों को जूत मारो’ अशा घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसने मुंबई भाजपा विरोधातला मोर्चा उधळून लावला. युवक काँग्रेसच्या कार्यकर्ताना मुंबई भाजप कार्यालयावर यायच्या आधीच रोखण्यात आले.

मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा म्हणाले की, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याचा भारत मातेवर विश्वास आहे. भाजपा कार्यालयाकडे बोटे दाखवणाऱ्या दाऊद आणि टिपू सुलतानचा औलादींवर पोलिसांनी कारवाई केली नाही, तर भाजपचे कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील. आज पोलिसांच्या विनंती मुळें थांबत आहोत, परंतु काँग्रेस कार्यकर्ते भाजपाच्या वसंत स्मृतीवर हल्ला करत असतील तर आम्ही हल्ल्याचे उत्तर हल्ल्यानेच देऊ, असे मत मंगल जी यांनी त्यावेळी व्यक्त केले.

गेल्या काही दिवसांपासून टिपू सुलतान ह्या एकाने नावाने राज्याचे राजकारण ढवळून काढले असतानाच, पुन्हा मुंबईत भाजप आणि काँग्रेसचा सामना झाला आहे. काही दिवसातच मुंबई महापालिकच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे. यावेळी सर्व राजकीय पक्षांन कंबर कसली आहे. येत्या महानगरपालिकेच शिवसेनेच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावण्याचा भाजपचा प्रयत्न असेल, तर महाविकास आघाडीच्या मदतीने मुंबईचा गड राखण्याचे आव्हान शिवसेनेसमोर असणार आहे. मालाडमधील क्रिडा संकुलांच्या वादानंतर काँग्रेस आणि भाजप संघर्ष पुन्हा वाढला आहे. जशा पालिका निवडणुका जवळ येतील तशी या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button