Top Newsराजकारण

मराठा समन्वयकांच्या मागण्या मान्य करण्याची सरकारची तयारी

मुंबई : छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी मराठा आरक्षणाबाबत ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी राज्य सरकारने दर्शवली आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज कोल्हापूर येते संभाजीराजे यांच्या उपस्थितीत मराठा क्रांती मूक आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर आता राज्य सरकारने संभाजीराजेंसह मराठा समन्वयकांना चर्चेसाठी बोलावलं आहे. मराठा क्रांती मूक आंदोलनामुळे महाराष्ट्र राज्य सरकारने छत्रपती संभाजीराजे आणि मराठा क्रांती मोर्चा समन्वयकानी ज्या मागण्या मांडल्या त्या मान्य करण्याची तयारी दर्शवली आहे.

कोल्हापूरच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने संभाजीराजेंना भेटीच निमंत्रण दिलं आहे. या बैठकीला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मराठा आरक्षण उपसमिती सदस्य आणि छत्रपती संभाजीराजे तसेच राज्य समन्वयक उपस्थित असणार आहेत. राज्य समन्वयक करणं गायकर, राजेंद्र कोंढरे, रगुनाथ चित्रे पाटील, अंकुश कदम, विनोद साबळे, रमेश केरे आदी समन्वय बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर येत आहे.

सारथी, अण्णासाहेब पाटील महामंडळ, सुपर न्यूमरी, वसतिगृह, ओबीसींप्रमाणे मराठा समाजाला सवलती, कोपर्डी पीडितेला न्याय या राज्यसरकार कडील मागण्यांवर या बैठकीत तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button