सिग्निफायकडून पहिला षटकोनी एलईडी डाऊनलाइट फिलिप्स हेक्सास्टाइल
नवी दिल्ली – सिग्निफाय (Signify) (युरोनेक्स्ट : लाइट), या प्रकाशयंत्रणेतील जगातील आघाडीच्या कंपनीने आज आपल्या फिलिप्स हेक्झास्टाइल एलईडी डाऊनलाइटचे भारतात अनावरण केले. हा एक खास आगळ्यावेगळ्या स्वरूपाचा षटकोनी डाऊनलाइट आहे, जो छतावर विविध प्रकारचे आकार तयार करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने लावता येईल. तसेच, त्यात एक गोल फिटमेंट आहे. त्यामुळे तो छतांवर नियमित गोल आकारच्या कट आऊट्समध्ये स्थापित करणे शक्य होईल.
Description automatically generated डाऊनलाइटमध्ये प्रति वॅट १०० ल्युमेन्सची उच्च ऊर्जा कार्यक्षमता आहे आणि ती वॉर्म व्हाइट व कूल व्हाइट पर्यायांमध्ये आणि तीन वॅट्समध्ये उपलब्ध आहे- ८ वॅट्स, १२ वॅट्स आणि १५ वॅट्स. त्यात कंपनीचे आयकम्फर्ट तंत्रज्ञानही आहे, जे डोळ्यांसाठी शांतता देणारे आहे.
A picture containing indoor, ceiling, wall, floor
Description automatically generatedडाऊनलाइट्स ही भारतात वाढती वर्गवारी आहे आणि ती नवीन घरे बांधणाऱ्या किंवा रचनात्मक बदल करणाऱ्या लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. सध्या डाऊनलाइट्स २ आकारांमध्ये उपलब्ध आहेत- गोल किंवा चौकोनी आणि कार्यक्षम व परिसरातील प्रकाशयोजनेसाठी एकल युनिट म्हणून स्थापित केलेल्या आहेत. फिलिप्स हेक्झास्टाइल डाऊनलाइट विविध प्रकारांमध्ये लावता येते. त्यामुळे सिग्निफाय फक्त आवश्यक आणि आसपासची प्रकाशयोजना देण्याबरोबरच सिग्निफाय डाऊनलाइट्सना एक डिझाइन घटक म्हणून सुसज्ज करत आहे. ग्राहक आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून आपल्या छतावर अमर्याद डिझाइन्स तयार करू शकतात. त्यासाठी विविध आकारांमध्ये षटकोनी आकाराच्या डाऊनलाइट्स ठेवतात.
या अनावरणाबाबत बोलताना, सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक सुमीत जोशी म्हणाले की, “आम्हाला आमचे नवीन उत्पादन- हेक्झास्टाइल डाऊनलाइट भारतात आणताना खूप आनंद होत आहे. त्याचा षटकोनी आकार ग्राहकांना आपली कलात्मकता दाखवण्यासाठी आणि आपल्या घरासाठी खऱ्या अर्थाने वैयक्तिक प्रकाश अनुभव देण्यासाठी उपयुक्त ठरेल. या नावीन्यपूर्ण उत्पादनासोबत आम्ही फक्त प्रकाशयंत्रणा ते प्रकाशयंत्रणा आणि डिझाइनपर्यंत आमच्या उत्पादनाची कार्यक्षमता वाढवली आहे.”