मुक्तपीठ

देश पुन्हा लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर

- प्रा. डॉ. सुधीर अग्रवाल

कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेमुळे देशातील परिस्थिती गंभीर बनली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात विक्रमी रुग्णवाढ होत असून, रुग्णांचे बेडसह इतर मुलभूत आरोग्य सुविधांअभावी अतोनात हाल होत असल्याचं दिसत आहे. या परिस्थितीमुळे पुन्हा देशात पुन्हा लॉकडाउन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे

देशात सध्या करोनाने कहर केला असून याचा फटका महाराष्ट्रासह अनेक राज्यांना बसला आहे. महाराष्ट्रात कडक निर्बंध लावण्यात आले असून दिल्लीसोबत इतर अनेक राज्यांनीही कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. यासाठी अनेक राज्यांनी केंद्राकडे मदतही मागितली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव राखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाययोजना केल्या जात असल्या तरी उपयोग होताना दिसत नाही.या पार्श्वभूमीवर केंद्रित आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन व्हिडीओ कॉंफेरन्सिंग द्वारा राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांशी संवाद साधला.देशातील बहुतांश आरोग्य मंत्र्यांनी बैठकीला उपस्थित होते।जवळपास सर्वच आरोग्य मंत्र्यांनी कोरोना संसर्गामुळे देशातील परिस्थिती हाताबाहेर जात असून लॉक डाऊन शिवाय पर्याय नसल्याचा सूर या बैठकीतून उमटला सर्वच राज्यांनी लॉककडाऊनची मागणी लावून धरली.त्यामुळे लवकरच मोदी सरकार संपूर्ण देशात परत एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भारतात थैमान घातले आहे. महाराष्ट्र, छत्तीसगढ, पंजाब, मध्य प्रदेश, दिल्लीपाठोपाठ देशातील इतर राज्यांतही कोरोनाने हातपाय पसरले असून दररोज धडकी भरवणारी आकडेवारी समोर येऊ लागली आहे. देशात आज पुन्हा एकदा विक्रमी रुग्णवाढ नोंदवली गेली असून मृत्यूचा आकडाही हजारांच्या पुढे आहे. देशात मागील २४ तासांत तब्बल २,६१,५०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून १,५०१ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता १,४७,८८,१०९ वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा १,७७,१५० इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात १,३८,४२३ जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत १,२८,०९,६४३ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे, तर सध्या १८,०१३१६ जण कोरोनावर उपचार घेत आहेत.

गेल्या वर्षी १७ सप्टेंबरला देशात ९७ हजार ८९४ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. कोरोना काळातील ती सर्वाधिक दैनंदिन रुग्णवाढ होती. त्यानंतर यावर्षी ५ एप्रिलला पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णवाढीने एक लाखांचा टप्पा पार केला होता. दरम्यान, २०२० साली भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली होती. परंतु त्यानंतर काही महिन्यांनी अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉक काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली. सध्या भारतात कोरोना लसीकरण सुरू आहे, मात्र देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या कोटीच्या संख्येत गेल्याने चिंता वाढली आहे. तसेच दररोज आढळणाऱ्या नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button