मुक्तपीठ

लढाऊ बंगाली वाघीण…!

- श्रीनिवास खांगटे

अवघा बलवान भाजपा, बलाढ्य सेनापती अमित शहा, सर्व प्रकारच्या सत्तेची ताकद, साम, दाम, दंड, भेद सगळी ब्रम्हास्त्रे परजून वापरलेली.!
प.बंगाल ताब्यात घ्यायचाच म्हणून निर्धाराने मैदानात उतरलेले स्वयं माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी..त्यांच्या ‘रोबिंद्रनाथ टागोर’ गेटअपसह.!!
अख्ख्या देशातले मोदी समर्थक-भक्त, चाहत्यांचा वाढता हल्ला गुल्ला जल्लोष.!
विरुद्ध अनेक दशकांची डाव्यांची मक्तेदारी मोडून सत्तेवर आलेली एकटी स्त्री, ममता बॅनर्जी.! इतके वर्षे सत्तेत असल्यानंतर जनतेला हवा असलेला बदल, मोदींबद्दल बंगाली जनतेला वाटू लागलेलं आकर्षण.!
भाजपाने आक्रमकपणे ती अल्पसंख्याक धार्जिणी असल्याचा सुरू केलेला प्रभावी प्रचार.!!
अँटीइनकम्बन्सी चा धोका.. आणि भाजपाने आपल्या नेहमीच्या स्टाईलने फोडलेला तिचा पक्ष आणि नेतेगण.!!
अवघा देशभरातील मीडिया तिच्यावरोधात. तिच्या उद्धटपणाचे आणि भांडखोरपणाचे चर्चे माध्यमांमध्ये.!
सारं काही विरोधात असतांना ती प्राणपणाने लढली..अक्षरशः जखमी झाली..पण तिनं लढाई अर्धवट सोडली नाही.!
खुर्चीवरून रॅल्या केल्या.! तिची झुंजार आणि लढाऊ वृत्ती पाहून जणू बंगालची दुर्गाच अवतारल्याचा भास झाला.!
भाजपाने तिला प्रचंड डिवचले.. तिला अनोळखी असलेल्या मतदारसंघात उभे राहण्याचे मुद्दाम आव्हान देऊन ट्रॅप केले..जेणेकरून ती त्या मतदारसंघात स्वतःसाठी गुंतावी.
तिने मतदारसंघाकडे दुर्लक्ष करून सरळ अख्खा बंगाल घुसळून काढला.!
साक्षात मोदी मैदानात उतरल्याने ती प्रसंगावधान राखून अष्टौप्रहर सावध राहिली.!
मोदींनी लाखाच्या सभा घेतल्या.. आणि भाजपा समर्थक, कार्यकर्ते प.बंगाल ताब्यात घेतल्याच्या गगनभेदी ललकाऱ्या देऊ लागले.!
आणि तिनं देशाच्या सर्वात बलवान पक्षाचे आणि ताकदवान वलयांकित नेत्यांचे आव्हान मोडून काढले.!
पुन्हा बहुमत मिळवले.! ती नव्या मतदारसंघात भले हरली असेल, पण अख्खा बंगाल मात्र तिने भाजपच्या घशात जाऊ दिला नाही.!
या वृद्धत्वाकडे जाणाऱ्या या लढाऊ वाघिणीस माझा मानाचा अखंड मुजरा.!!
मोदींनी उत्तम परफॉर्मन्स केला..पण ती आणि तिचा पक्ष शेवटपर्यंत अजिंक्य राहिला..

शेवटी जो जिता वही सिकंदर..!

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button