लतादीदींच्या सन्मानार्थ केंद्राकडून लवकरच टपाल तिकीट जारी करणार
लतादीदींचं स्वप्न मविआ सरकार पूर्ण करणार : उदय सामंत
नवी दिल्ली : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या सन्मानार्थ भारत सरकार टपाल तिकीट जारी करणार आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ही माहिती दिली. वैष्णव यांच्याकडे रेल्वेसह दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचा कार्यभार आहे.
ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांचे काल रुग्णालयात दीर्घ उपचारानंतर निधन झाले. यानंतर केंद्र सरकारनं दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः काल मुंबईत जाऊन लतादीदींना श्रद्धांजली वाहिली. आता भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित दिवंगत गायकाच्या स्मरणार्थ सरकार टपाल तिकीट काढण्याच्या तयारीत असल्याचे मंत्री वैष्णव यांनी सांगितले.
रेल्वे भरतीवरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री म्हणाले, पुढील वेळेपासून भरती प्रक्रिया अधिक चांगली होणार असून रेल्वे भरती परीक्षा पद्धतशीर होण्यासाठी आमचे प्रयत्न असणार आहेत. रेल्वेबाबत बोलताना वैष्णव यांनी सांगितलं की, प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यास सरकार प्रयत्नशील आहे. प्रवाशांच्या सर्वांगीण विकासासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: यात लक्ष घालत असून लवकरच विविध धोरणांची अंमलबजावणी केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
लतादीदींचं स्वप्न मविआ सरकार पूर्ण करणार : उदय सामंत
आठवणीत तर अख्खं जग लतादिदींना ओळखायचं. गानसम्राज्ञी म्हणून त्यांनी मोठं प्रस्थ निर्माण केलं होतं. दिदींच्या जाण्याने सांस्कृतिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झालीय. माझा वाढदिवस असो किंवा त्यांचा वाढदिवस मी त्यांच्याशी फोनवर बोलायचो. त्यांचे जे स्वप्न आहे दीनानाथ मंगेशकर यांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय सुरु करावे. त्याचा मंत्री म्हणून मी पाठपुरावा करत होतो. अनेक वेळा फोन करून मला आशीर्वाद दिले होते. दीनानाथ मंगेशकर नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय त्यांना उभं करायचं होतं. त्यांना आदरांजली म्हणून दीनानाथ मंगेशकरांच्या नावाने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काहीच दिवसात सुरु केलं जाणार आहे, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
संगीत विद्यापीठ, लतादीदींचा पुतळा, पुरस्कार आणि…; मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा
दरम्यान मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली आहे. लतादीदींना श्रद्धांजली वाहत त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण केले आहे. यावेळी त्यांनी लतादीदींच्या नावाने संगीत अकादमी आणि विद्यापीठ सुरू करण्यापासून त्यांचा पुतळा उभारण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.
शिवराज सिंह चौहान यांनी, लतादीदींच्या निधनाने कोट्यवधी भारतीयांना त्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्याची भावना आहे. त्यांच्या गाण्यांनी आपल्या सर्वांच्या जीवनात नवा उत्साह आणि ऊर्जा संचारली. पण लतादीदींच्या जाण्याने आपल्याही आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली आहे, जी कधीही भरून काढता येणार नाही” असं म्हटलं आहे. लता मंगेशकर यांचा जन्म इंदूरमध्ये झाला होता. या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्मरणार्थ इंदूरमध्ये संगीत अकादमी, संगीत विद्यापीठ आणि संग्रहालय स्थापन करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री चौहान यांनी केली. संगीत विद्यापीठात मुलांना सुरांचा सराव करता येईल. तर, त्यांची सर्व गाणी संग्रहालयात उपलब्ध असतील असंही म्हटलं आहे.
लतादीदींचा पुतळाही उभारण्याची घोषणा
लतादीदी या केवळ संगीत विश्वापर्यंत मर्यादित नव्हत्या, तर त्यांनी देशाला देशभक्तीची प्रेरणा दिली. लतादीदींच्या वाढदिवसाच्या दिवशी दरवर्षी लता मंगेशकर पुरस्कार दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच इंदूरमध्ये लतादीदींचा पुतळाही उभारण्याची घोषणा यावेळी शिवराज सिंह चौहान यांनी केली. १९९१ मध्ये ‘लेकिन’ हा अल्बम प्रदर्शित झाला होता. हे गीत लता मंगेशकर यांचे बंधू हृदयनाथ मंगेशकर यांनी कम्पोज केलं होतं.
जवळपास तीन दशकांपूर्वी राजस्थानमध्ये भीषण दुष्काळ पडला होता. त्यावेळी गरीबांच्या मदतीसाठी जयपूरमध्ये एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी लतादीदी या जयपूरला आल्या होत्या. जयपूरच्या सवाई मानसिंह मैदानात झालेल्या या कार्यक्रमाला जवळपास ४० हजार प्रेक्षक आले होते. तत्कालीन मुख्यमंत्री हरिदेव जोशी यांनी तिकीट काढून सवाई मानसिंह मैदानात प्रेक्षकांमध्ये बसून लतादीदींचे गाणे ऐकले होते. भीषण दुष्काळात पीडितांच्या मदतीसाठी लता मंगेशकर यांनी १ कोटी १ लाख रुपयांचा धनादेश हरिदेव जोशी यांच्याकडे सुपूर्द केला होता. लता मंगेशकर यांच्या आवाजानं प्रत्येक देशवासियाच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. त्यांची हजारो गाणी प्रत्येकाच्या ओठांवर आहेत. राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये लतादीदींना श्रद्धांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.