Top Newsराजकारण

आणीबाणीचा काळा दिवस विसरणे शक्य नाही : पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : देशात इंदिरा गांधी सरकारच्या काळात २५ जून १९७५ रोजी आणीबाणी लागू करण्यात आली. आज त्या दिवसाला ४६ वर्ष पूर्ण होत आहेत. याच निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधलाय. तत्कालीन काँग्रेस सरकारनं केवळ आपल्या लोकशाही मूल्यांना चिरडलं नाही तर आपल्या महापुरुषांचा ऐतिहासिक वारसादेखील अंधारात ठेवला होता, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणीबाणीला विरोध करणाऱ्या नेत्यांचीही आठवण करून दिली.

‘अशा पद्धतीनं कॉंग्रेसनं आपली लोकशाही नीती पायदळी तुडवली. आणीबाणीचा प्रतिकार आणि भारतीय लोकशाहीचं रक्षण करणाऱ्या त्या सर्व महान व्यक्तींचं स्मरण करत आहोत’ असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय.

यासोबतच, इन्स्टाग्रामवर भाजपद्वारे जारी करण्यात आलेल्या आणीबाणीशी निगडीत स्लाईडस पंतप्रधानांनी शेअर केल्या आहेत. आणीबाणी दरम्यान तत्कालीन काँग्रेस सरकारनं कोणकोणत्या गोष्टींवर बंदी घातली होती, हे या स्लाईडमधून भाजपनं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. ‘आणीबाणीचा तो काळा दिवस विसरता येणं शक्य नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही संकल्पना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करू आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करु’ असंही पंतप्रधानांनी ट्विट केलंय.

भाजपच्या म्हणण्यानुसार, १९७५ ते १९७७ दरम्यान अर्थात आणीबाणीच्या काळात स्वातंत्र्य सैनिकांना तसंच शहीद देशभक्त चंद्रशेखर आझाद, भगत सिंह यांच्यावर तयार करण्यात आलेल्या सिनेमांवरही काँग्रेसकडून बंदी घालण्यात आली होती. याशिवाय किशोर कुमार यांचे गाणे, राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांच्या विचारांच्या प्रसारालाही काँग्रेसकडून बंदी घालण्यात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button