गुळाच्या ढेपेला मुंगळे चिटकलेत : फडणवीस
मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचं हे सरकार चुकून आलेलं आहे. ज्या पद्धतीने गुळाच्या ढेपेला चिकटलेले मुंगळे आहेत. तसं हे सरकार आहे, असं टीकास्त्र सोडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सारवासारव केली. ते मुंबईत बोलत होते. भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेवर शिवसेनेनं जत्रा अशी टीका केली. मात्र ज्यांना जत्रेचा अनुभव आहे, त्यांना दुसरं काय दिसणार, लोकांचा चांगला प्रतिसाद दिसतोय, असा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शिवस्मारकाबाबत या सरकारने दोन वर्षात काहीही केलं नाही. सरकारने हे गांभीर्याने घ्यायला हवे. सुप्रीम कोर्टात एक स्थगिती आहे ती उठवायला हवी, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले. मात्र आपली काळात किती प्रगती झाली हे सांगण्यास मात्र त्यांनी नकार दिला.
पत्रकारांनी कोरोना काळात महत्वाची भूमिका निभावली आहे. अनेकांनी पत्रकारांना फ्रन्ट लाईन वर्कर म्हणून घोषित केलं आहे. आम्हीही तशी विनंती राज्य सरकारकडे केली होती. इतर राज्यांनी केलं आहे, पण आपल्या राज्यात त्यावर निर्णय झाला नाही, असं फडणवीसांनी सांगितलं.
शेतकऱ्यांना आपली व्यथा मांडायला व्यासपीठ नाही. काही अधिकारी स्पेशल पोस्टिंगने आलेले आहेत. मंत्रालय येथील शेतकऱ्याची आत्महत्या ही दुर्दैवी आहे. किमान मृत्यूनंतर तरी शेतकऱ्यांचं म्हणणे सरकारने ऐकावं, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.