राजकारण

ठाकरे सरकार सत्तेत आल्यापासून राज्याला पनवती : नितेश राणे

ठाणे: राज्यातील ठाकरे सरकार हे चपट्या पायाचे सरकार आहे. हे सरकार आल्यानंतर गेल्या दोन वर्षापासून राज्याला पनवती लागली आहे, अशी घणाघाती टीका भाजप आमदार नितेश राणे यांनी केली.

नितेश राणे यामी ठाण्यात पत्रकार परिषद घेऊन ही टीका केली. यावेळी आमदार निरंजन डावखरे, भाजपचे प्रदेश सचिव संदीप लेले, सरचिटणीस विलास साठे, उपाध्यक्ष सागर भदे आदी यावेळी उपस्थित होते. महाविकास आघाडीचे सरकार हे चपट्या पायाचं सरकार आहे. गेल्या दोन वर्षांपासून सत्तेत आल्यापासून राज्याला पनवती लागलेली आहे. या सरकारवर कोणीही अपेक्षा ठेवू शकत नाही. मराठा आरक्षणाच्या विषयावर या सरकारने जनतेची दिशाभूल केली आहे. लोकांना फसवले आहे. त्यामुळे मराठा समाजाने या सरकारकडून नेमकी काय अपेक्षा ठेवावी, असा सवाल नितेश राणे यांनी केला.

राज्यात टाचणी पडली किंवा यांच्या घरात पाणी आले नाही की हे केंद्राकडे बोट दाखवतात. सगळे सांगत होते केंद्रामुळे मराठा आरक्षण मिळत नाही. संसदेमध्ये एक कायदा पारित केला गेला. त्यात आरक्षण कुठल्या समाजाला किती, कसं द्यायचं, याचे सगळे अधिकार राज्य सरकारचे असल्याचं या कायद्यात नमूद करण्यात आलं. सुप्रीम कोर्टामध्ये पण या सगळयाची जबाबदारी राज्य सरकारवर दिलेली आहे. या अगोदर राणे समिती स्थापन झाली आघडी सरकारच्या काळात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण दिले गेले. राज्य सरकारला अधिकार दिले. राज्य सरकार आपल्या अधिकार चौकटीत आरक्षण देऊ शकते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमध्ये एवढी ताकद दिली होती की, त्यांना केंद्राकडे हात पसरण्याची गरज नाही. एवढी ताकद त्या घटनेत आहे. असे यावेळी ते म्हणाले.

माझं मराठा समाजाच्या तरुण-तरुणींनी ही दोन वर्षे नजरेसमोर ठेवली पाहिजेत. ठाकरे सरकारला आर्यन खानची चिंता आहे पण पाटलाच्या मुलाची चिंता नाही. ५८ मोर्चे काढणाऱ्या आमच्या मराठा बांधवांनी तो काळ पुन्हा परत आणला पाहिजे. हे गेंड्याच्या कातडीचे लोक आहेत. त्यांना झुकवलंच पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीच्या उद्धव ठाकरे सरकारने गेल्या दोन वर्षांत मराठा समाजाचे गंभीर नुकसान केले आहे. त्याबद्दल या सरकारने समाजाची माफी मागितली पाहिजे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी ठोस काम केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button