अर्थ-उद्योग

टाटा मोटर्सकडून २१ नवीन व्‍यावसायिक वाहनांचे अनावरण

मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्‍या सर्वात मोठ्या व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनीने आज २१ नवीन उत्‍पादने व व्‍हेरिएण्‍ट्सची व्‍यापक व सर्वसमावेशक श्रेणीचे अनावरण करत भारताच्‍या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्‍याप्रती आपल्‍या कटिबद्धतेला अधिक दृढ केले. विभाग व उपयोजनांमध्‍ये माल व प्रवासी परिवहनाच्‍या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन व रचना करण्‍यात आलेली ही अत्‍याधुनिक वाहने टाटा मोटर्सचे प्रमाणित ‘पॉवर ऑफ ६’ लाभ तत्त्वांना अधिक दृढ करत विशिष्‍ट वापर व उपयोजनांची पूर्तता करतात आणि उच्‍च उत्‍पादकता व कमी मालकीहक्‍काचा खर्च (टीसीओ) देतात.

२१ वाहनांचे अनावरण करत टाटा मोटर्सचे कार्यकारी संचालक गिरीश वाघ म्‍हणाले, पायाभूत सुविधांचे स्रोत, ग्राहक वापर आणि भारतीय अर्थव्‍यवस्‍थेला सक्षम करणारे ई-कॉमर्स एकसंधीपणे संचालित राहण्‍यासाठी सतत परिवहनाच्‍या साह्यतेची गरज असते. व्‍यावसायिक वाहनांमध्‍ये अग्रणी म्‍हणून आम्‍ही स्‍मार्टर, फ्युचर-रेडी उत्‍पादने व सेवा सादर करत ग्राहकांना उच्‍च दर्जाचे मूल्‍य तत्त्व देणे सुरूच ठेवत आहोत. आज आम्‍ही अनावरण करत असलेली २१ वैशिष्‍ट्य-संपन्‍न वाहने भारतीय अर्थव्‍यवस्‍थेच्‍या सर्वसमावेशक गरजा आणि कार्यक्षम परिवहनाप्रती वाढत्‍या मागणीची पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आली आहेत. या वाहनांचा प्रत्‍येक पैलू विविध ड्युटी सायकल्‍ससह खास उपयोजनांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यासाठी उद्देशपूर्णरित्‍या सुधारित करण्‍यात आला आहे. आधुनिक प्रगत तंत्रज्ञान, सुधारित पॉवरट्रेन्‍स आणि आरामदायीपणा व सोयीसुविधांमधील सुधारणा असलेली आमची वाहने ग्राहकांच्‍या कमी खर्च करत अधिक लाभांसह अधिक महसूल प्राप्‍त करू देणा-या उच्‍च वाहन वापरांसदर्भातील गरजांची पूर्तता करण्‍यासाठी अनुकूल आहेत.

टाटा मोटर्स देशाच्‍या विकासाला चालना देण्‍यामध्‍ये लक्षणीय योगदान दिलेल्‍या तंत्रज्ञान व उत्‍पादन नवोन्‍मेष्‍कारांमध्‍ये अग्रस्‍थानी राहिलेली आहे. उत्‍पादन नवोन्‍मेष्‍कारांमध्‍ये, तसेच विभागातील सादरीकरणांमध्‍ये अग्रस्‍थानी राहण्‍यासोबत संपूर्ण सेवा २.० उपक्रमाच्‍या माध्‍यमातून व्‍यापक वेईकल मेन्‍टेनन्‍स उपलब्‍ध करून देण्‍यासाठी वैश्विक मूल्‍यवर्धित सेवा, फ्लीट एज आणि भारताच्‍या व्‍यापक सेवा नेटवर्ककडून २४x७ सपोर्टच्‍या माध्‍यमातून सानुकूल फ्लीट व्‍यवस्‍थापन अशा सुविधांसह टाटा मोटर्स ग्राहकांना अधिक लाभ व मालकीहक्‍काचा कमी खर्च देणा-या सर्वांगीण परिवहन उपाययोजनांच्‍या माध्‍यमातून नवीन बेंचमार्क्‍स स्‍थापित करत आहे.

मीडियम अ‍ॅण्‍ड हेवी कमर्शियल वेईकल्‍स
टाटा मोटर्स एमअ‍ॅण्‍डएचसीव्‍ही ट्रक्‍स ७५ वर्षांहून अधिक काळापासून देशाला प्रबळ करण्‍यामध्‍ये मदत करत आले आहेत. भारत विकासाच्‍या दिशेने वाटचाल करत असताना टाटा मोटर्स आज भावी गरजांची पूर्तता करत अग्रस्‍थानी राहिली आहे. निश्चितच बांधकाम व माल परिवहनामध्‍ये अग्रणी असलेल्‍या कंपनीने आतापर्यंत २५ लाखांहून अधिक ट्रक्‍ससह १ लाखाहून अधिक बीएस-६ वाहने सादर केली आहेत. हे ट्रक्‍स खडतर काळामध्‍ये खंबीरपणे उभे राहिले आहेत आणि विविध उपयोजनांमध्‍ये कार्यरत असलेल्‍या ग्राहकांना मूल्‍य दिले आहे. ते माल वाहतूक, मार्केट लोड, कृषी, सिमेंट, आयर्न व स्‍टील, कंटेनर, वेईकल कॅरियर, पेट्रोलियम, केमिकल, वॉटर टँकर्स, एलपीजी, एफएमसीजी, व्‍हाइट गूड्स, पेरिशेबल्‍स, बांधकाम, खाणकाम, महापालिका उपयोजनांसह लोड बॉडीज, ट्रिपर्स, टँकर्स, बल्‍कर्स व ट्रेलर्स असे अनेक फुली-बिल्‍ट बॉडी पर्याय अशा व्‍यापक श्रेणीची पूर्तता करतात.

इंटरमीजिएट अ‍ॅण्‍ड लाइट कमर्शियल वेईकल्‍स

१९८६ मध्‍ये भारतीय बाजारपेठेसाठी वजनाने हलक्‍या ट्रक्‍सची संकल्‍पना सादर केल्‍यापासून टाटा मोटर्स आयअ‍ॅण्‍डएलसीव्‍ही श्रेणी आकार, स्‍केल, उपस्थिती व लोकप्रियतेसंदर्भात लक्षणीयरित्‍या विकसित झाली आहे. डिझेल व सीएनजी पॉवरट्रेन्‍समध्‍ये उपलब्‍ध असलेल्या ५०,००० हून अधिक बीएस-६ आयअॅण्‍डएलसीव्‍हींची विक्री यापूर्वीच करण्‍यात आली आहे. रचना, कार्यक्षमता व विविध प्रकारच्‍या उपयोजनांसाठी प्रसिद्ध असलेल्‍या टाटा मोटर्स आयअॅण्‍डएलसीव्‍ही वाहनांनी ग्राहकांना लाभक्षमता वाढवण्‍यामध्‍ये मदत केली आहे. ४-१८ टन जीव्‍हीडब्‍ल्‍यूमध्‍ये ऑफर करण्‍यात येणारी ही श्रेणी लास्‍ट-माइल, तसेच मध्‍यम ते लांबच्‍या प्रवासासाठी उपयुक्‍त आहे. या श्रेणीमध्‍ये ड्युटी सायकल आवश्‍यकतेनुसार केबिन निवड करण्‍याची सुविधा आहे. लांब डेक झपाट्याने वाढत असलेल्‍या ई-कॉमर्स विभागाच्‍या अद्वितीय गरजांची उत्तमरित्‍या पूर्तता करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे.

स्‍मॉल कमर्शियल वेईकल्‍स अ‍ॅण्‍ड पिक-अप्‍स

टाटा मोटर्स एससीव्‍हीअ‍ॅण्‍डपीयूनी जवळपास ३० लाख भारतीयांना उदरनिर्वाहाचे अभिमानी साधन देत शहरी व ग्रामीण भागांमध्‍ये स्‍वयं-रोजगाराला चालना दिली आहे. एससीव्‍हीअ‍ॅण्‍डपीयू पोर्टफोलिओ मागील १६ वर्षांपासून अपवादात्‍मकरित्‍या सर्वसमावेशक बनला आहे. या पोर्टफोलिओचा लास्‍ट-माइल परिवहनामध्‍ये ग्राहकांना सुरक्षित, स्‍मार्टर व मूल्‍य-निर्मिती ऑफरिंग देण्‍यावर भर राहिला आहे. या श्रेणीमध्‍ये संपूर्ण बॉडी स्‍टाइल्‍सना सामील करणारे एस, इस्‍ट्रा व प्रबळ योद्धा ब्रॅण्‍ड्सचा समावेश आहे. टाटा एससीव्‍ही मार्केट लॉजिस्टिक्‍स, फळे, भाज्‍या व कृषीउत्‍पादने, पेये व बॉटल्‍स, एफएमसीजी व एफएमसीडी गूड्स, ई-कॉमर्स, पार्सल व कुरियर, फर्निचर, पॅक केलेले एलपीजी सिलिंडर्स, दुग्‍धउत्‍पादने, फार्मा व फूड उत्‍पादने यांचे वितरण, रेफ्रिजरेटेड परिवहन, तसेच कचरा व्‍यवस्‍थापन उपयोजन अशा विविध उपयोजनांसाठी लास्‍ट-माइल डिलिव्‍हरीमध्‍ये अग्रस्‍थानी आहेत.

पॅसेंजर कमर्शियल वेईकल्स

टाटा मोटर्स लिमिटेड पन्‍नास वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत आहे आणि कंपनीने भारतातील लोकांच्‍या रस्‍त्‍यावर परिवहन करण्‍याच्‍या पद्धतीला पुनर्परिभाषित करणे सुरूच ठेवले आहे. आंतरशहरीय शालेय विद्यार्थी किंवा कर्मचारी परिवहनापासून आंतरशहरीय परिवहनापर्यंत उपयुक्‍त ही श्रेणी सीएनजी, एलएनजी, हायड्रोजन सेल सारखी शुद्ध, हरित तंत्रज्ञाने देण्‍यामध्‍ये अग्रस्‍थानी राहिली आहे, तसेच इलेक्ट्रिक बससह अग्रस्‍थान कायम राखत आहे. वर्षानुवर्षे ६०० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस १० भारतीय रस्‍त्‍यांवर धावत आहेत आणि त्‍यांनी एकूण जवळपास २० दशलक्ष किलोमीटर अंतर पार केले आहे. पॅसेंजर सीव्‍ही श्रेणी प्रवासी व ड्रायव्‍हर आरामदायी सुविधेवर विशेष भर देते, तसेच ऑपरेटरला लाभ मिळवून देण्‍यावर देखील भर देते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button