नंदीग्रामच्या निकालात छेडछाड, पुन्हा मतमोजणीची मागणी; ममता बॅनर्जी यांचा कोर्टात जाण्याचा इशारा
कोलकाता : देशाचे लक्ष लागून असलेल्या नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. मात्र आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या. यासंदर्भात एएनआयनं ट्वीट केलं आहे. दरम्यान नंदीग्रामध्ये फेरमतमोजणीची मागणी ममता बॅनर्जी यांनी केली आहे.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होते. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते.
नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. राज्यात निर्विवादपणे एकहाती सत्ता मिळवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या नंदीग्राममधील पराभवानंतर गड आला पण सिंह गेला अशी स्थिती झाली आहे. ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही २२१ हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जींच्या पराभवावर शरद पवार म्हणाले, हा ‘रडीचा डाव!’
याबाबत शरद पवारांनी देखील ट्वीट केलं असून त्यांनी म्हटलं आहे की, बंगालच्या मतदारांनी भरभरून ममतांना पाठींबा दिला आणि सबंध देशाच्या सत्तेला पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता. पण ज्या पद्धतीने तिथे जे चाललंय याला ‘रडीचा डाव’ एवढंच म्हणता येईल!, असं पवारांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, नंदीग्रामबद्दल काळजी करू नका, मी नंदीग्रामसाठी संघर्ष केला आहे. कारण माझ्यासाठी ही निवडणूक एक आंदोलन होती. नंदीग्राममधील लोकांनी जो कौल दिला तो मी स्वीकारते. आम्ही 221 हून अधिक जागा जिंकल्या आणि भाजप निवडणूक हरला आहे, असं ममता बॅनर्जींनी म्हटलं आहे.