राजकारण

अजित पवारांनी भाषेबद्दल बोलणं म्हणजे कुठला पिक्चर बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं!

आ. नितेश राणे यांचे जोरदार प्रत्युत्तर

सिंधुदुर्ग: भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेवरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांनी राणेंचा समाचार घेतला होता. त्यानंतर आता भाजप आमदार आणि नारायण राणेंचे सुपुत्र नितेश राणे यांनी अजित पवारांवर जहरी टीका केली आहे. ‘कुठली भाषा वापरावी हे अजित पवारांनी सांगण म्हणजे कुठला चित्रपट बघावा हे राज कुंद्रांनी सांगण्यासारखं आहे, असे नितेश राणे म्हणाले.

नारायण राणेंनी नुकताच पूरग्रस्त चिपळूणचा दौरा केला. त्यावेळी अधिकाऱ्यांना झापताना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. मी पाहणी करुन झाली तरी एकही अधिकारी मला येऊन भेटला नाही, हे काही बरोबर नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर अधिकारी सीएमसाहेबांना निरोप देण्यासाठी गेले आहेत, असं समोरील अधिकाऱ्याने सांगताच, सीएम बीएम गेला उडत, मला कुणाची नावं सांगू नका, असा टोला राणेंनी लगावला.

काही लोक पूरग्रस्तांच्या पाहणीसाठी येतात की अधिकाऱ्यांना बघण्यासाठी येतात हा प्रश्न निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांबाबत एवढ्या खालच्या स्तराची भाषा कधीही वापरली नव्हती. यशवंतराव चव्हाणांपासून, शरद पवारांपर्यंत अनेक मुख्यमंत्री झाले. मात्र अशाप्रकारची भाषा कोणत्याही विरोधी पक्षाने किंवा त्यांच्या पक्षातील इतर नेत्यांनी वापरली नाही. तुम्ही पूरग्रस्त भागाची पाहणी करायला आलात की मामलेदार, जिल्हाधिकाऱ्यांची पाहणी करायला आलात? अधिकाऱ्यांना पाहण्यासाठी हे लोक दौरा करतात का?, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button