Top Newsस्पोर्ट्स

टी-२० विश्वचषक : पाकिस्तानचा उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश; स्कॉटलंडवर ७२ धावांनी विजय

अबुधाबी : ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्य तुफान फॉर्मात असलेल्या पाकिस्तानच्या संघानं विजयरथ कायम राखत स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला आहे. पाकिस्ताननं स्कॉटलंड विरुद्धचा सामना ७२ धावांनी जिंकला. पाकिस्ताननं उभारलेल्या १९० धावांच्या आव्हानाला सामोरं जाताना स्कॉटलंडला २० षटकांच्या अखेरीस ६ बाद ११७ धावा करता आल्या. पाकिस्तानकडून शादाब खान यानं दोन विकेट्स मिळवल्या, तर शाहिन शाह आफ्रिदी, हारिस रौफ आणि हसन यांनी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. स्कॉटलंडकडून रिची बेरिंग्टन यानं सर्वाधिक नाबाद ५४ धावा केल्या.

पाकिस्ताननं स्पर्धेतील फॉर्म कायम ठेवत याही सामन्यात दमदार सुरुवात केली. मोहम्मद रिझवान (१५) लवकर तंबूत दाखल झाला तरी कर्णधार बाबर आझमनं ४७ चेंडूत ६६ धावांची खेळी साकारुन आज विराट कोहलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. ट्वेन्टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत चार अधर्शतकं ठोकली होती. या वर्ल्डकपमध्ये बाबर आझमनं आज चौथं अर्धशतक साकारलं आणि कोहलीच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. आता उपांत्य फेरीच्या लढतीत बाबर आझमच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे. पाकिस्तानची उपांत्य फेरीत आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध लढत होणार आहे.

पाकिस्तानचं कर्णधार बाबर आझम आणि अनुभव शोएब मलिकनं तुफान फटकेबाजी करत स्कॉटलंडच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. शोएब मलिकनं अखेरच्या षटकांमध्ये चौकार आणि षटकारांची आतषबाजी करत अवघ्या १८ चेंडूत नाबाद ५४ धावा केल्या. तर बाबर आझमनं ४७ चेंडूत ६६ धावांची खेळी भक्कम पाया रचला. बाबर आझमनं ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये गेल्या पाच सामन्यांमध्ये चौथ्यांदा अर्धशतकी साकारली आहे.

सामन्याची नाणेफेक जिंकून पाकिस्ताननं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मोहम्मद रिझवान यावेळी १५ धावांवर बाद झाला. पण कर्णधार बाबर आझमनं सातत्यपूर्ण खेळीचं दर्शन घडवत याही सामन्यात अर्धशतकी खेळी साकारली. ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये चार अर्धशतकं ठोकण्याच्या कोहलीच्या विक्रमाची बाबर आझमनं आज बरोबरी केली आहे. फाकर झमान (८) स्वस्तात बाद झाला. मोहम्मद हाफिजनं १९ चेंडूत ३१ धावा केल्या. अखेरीस शोएब मलिकनं आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत संघासाठी मोलाचं योगदान दिलं. अवघ्या १८ चेंडूत मलिकनं ५४ धावांची खेळी साकारली. यात मलिकनं ६ खणखणीत षटकार ठोकले.

पाकच्या मोहम्मद रिझवानचा विक्रम

या सामन्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान हा भलेही १५ धावांवर बाद झाला असेल तरी त्यानं एक जागतिक विक्रम आपल्या नावे केला आहे.
रिझवान हा टी २० क्रिकेटमध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा फलंदान बनला आहे. यापूर्वी हा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याच्या नावे होता. २०२१ मध्ये आतापर्यंत रिझवान यानं टी २० सामन्यात १६६६ धावा केल्या. ख्रिस गेलनं यापूर्वी २०१५ मध्ये १६६५ धावा करत हा विक्रम आपल्या नावे केला होता. विराट कोहलीनं यापूर्वी २०१६ मध्ये एका कॅलेंडर इयरमध्ये १६६४ धावा केल्या होत्या.

मोहम्मद रिझवान यावर्षी टी २० इंटरनॅशनलमध्ये सर्वाधिक धावा ठोकणारा फलंदाजही ठरला आहे. रिझवानच्या उत्तम परफॉर्मन्समुळे पाकिस्तानी संघाला टी २० विश्वचषकाच्या सेमी फायनलमध्ये प्रवेशाची संधी मिळाली आहे. भारताविरोधातील सामन्यात रिझवान आणि बाबरनं उत्तम फलंदाजी करत १५२ धावांची पार्टनरशिप केली होती. तसंच या सामन्यात भारताला १० विकेट्सनं पराभव स्वीकारावा लागला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button