Top Newsस्पोर्ट्स

सनरायजर्सच्या राजस्थानवरील विजयामुळे ‘प्ले ऑफ’ची गणिते बिघडली !

दुबई : आयपीएलच्या ४० व्या सामन्यात गुणतालिकेत खालच्या स्थानांवर असलेल्या सनरायजर्स हैद्राबाद आणि राजस्थान रॉयल्स या संघात टक्कर होती. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवल्या गेलेल्या या सामन्यात हैद्राबादने राजस्थानवर ७ गडी राखून विजय मिळवला आहे. सामन्यात बऱ्याच दिवसानंतर हैद्राबाद संघात पुनरागमन झालेल्या जेसन रॉय आणि कर्णधार केन विल्यमसन यांची अर्धशतकं हैद्राबादच्या विजयात महत्त्वाची ठरली. डेव्हिड वॉर्नरच्या जागी संघात स्थान मिळालेल्या जेसन रॉयच्या खेळीनं संजू सॅमसनच्या ८२ धावा व्यर्थ गेल्या. हैदराबादनं स्पर्धेतील दुसऱ्या विजयाची नोंद केली आणि राजस्थानच्या प्ले ऑफमध्ये प्रवेश करण्याच्या मनसुब्यांना धक्का दिला. हैद्राबादच्या विजयाने आता इतरांचेही गणित बिघडले आहे.

सामन्यात सुरुवातीला फलंदाजी घेतलेल्या राजस्थान रॉयल्स संघाने कर्णधार संजू सॅमसनच्या अर्धशतकाच्या जोरावर १६४ धावांपर्यंत मजल मारली होती. संजूने तुफान खेळी केली. पण त्याला इतर खेळाडूंची सोबत मात्र मिळाली नाही. ज्यानंतर हैद्राबादकडून मात्र सलामीवीर जेसन रॉयने अर्धशतक ठोकल्यानंतर अखेरच्या काही षटकात कर्णधार केनने अर्धशतक ठोकत संघाला ७ गडी राखत विजय मिळवून दिला.

सामन्यात सुरुवातीला फलंदाजी करणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाची पहिली विकेट त्वरीत गेल्यानंतर कर्णधार संजू सॅमसनने यशस्वी जैस्वालसोबत अर्धशतकी भागिदारी केली. पण यशस्वी बाद झाल्यानंतरही संजूने एकहाती खिंड लढवली. सर्व फलंदाज बाद होत असताना शेवटच्या षटकापर्यंत क्रिजवर राहत कर्णधार संजूने ८२ धावांची दमदार खेळी केली. पण गोलंदाजांना दिलेल्या लक्ष्याआधी हैद्राबाद संघाला रोखता न आल्याने अखेर राजस्थान संघ पराभूत झाला.

आज हैद्राबाद संघानं मिळवलेल्या विजयात महत्त्वाची कामगिरी सलामीवीर जेसन रॉय याची होती. उशीरा संघात दाखल झालेल्या जेसन रॉयकडून जी अपेक्षा होती तशीच धमाकेदार कामगिरी त्याने केली आहे. त्याने दमदार असं अर्धशतक ठोकत संघाला एक उत्तम सुरुवात करुन दिली. रॉयने ४२ चेंडूत ८ चौकार आणि एक षटकार ठोकत ६० धावा केल्या.

चांगल्या लयीत असलेला जेसन रॉय बाद झाल्यानंतर हैद्राबादचा युवा फलंदाज प्रियम गर्गही शून्यावर बाद झाला. ज्यानंतर संघ अडचणीत सापडला आहे असे वाटत होते. पण त्याचवेळी जागतिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा फलंदाज केन विल्यमसनने हैद्राबाद संघाचा कर्णधार असल्याचं कर्तव्य बजावर अप्रतिम असं नाबाद ५१ धावांत अर्धशतक ठोकतं सामना जिंकवून दिला. त्याला अभिषेक शर्माने नाबाद २१ धावांची उत्तम साथ दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button