राजकारण

सुधीर मुनगंटीवार यांच्याकडून सत्ताधाऱ्यांना खिंडीत गाठण्याचा प्रयत्न

मुंबई : गुजरात क्रिकेट स्टेटिअमने सरदार पटेल स्टेडिअमला नरेंद्र मोदी यांचे नाव दिल्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी मोदींची तुलना हिटलरसोबत केली. मंत्रीमंडळ बैठकीत शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला मान्यता दिली. शरद पवार मोठे नेते आहेत. मोदींनी बारामतीला जाऊन गुणगौरव केला. गाय व म्हैसकरिता रोजगार हमी योजनेत सहा गुरांचा गोठा १२ गुरांचा केला. एखादा मोठा कार्यक्रम केला. १२ आकडा दिला कुठून येतो ? मला कळत नाही असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चेदरम्यान केला. योजनेचं भाषणही १२ पानांचे असल्याचे आमदार सुनिल प्रभू यांनी त्यांच्या लक्षात आणून दिले. सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यपालांच्या अभिभाषणात राज्य सरकारच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करताना सत्ताधाऱ्यांना एकंदरीतच खिंडीत गाठण्याचा प्रयत्न आपल्या भाषणाच्या निमित्ताने केला.

राज्यात पेट्रोलच्या दरांच्या मुद्द्यावरही त्यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. राज्यात पेट्रोल ९० रूपयांना विकले जात आहे. पण केंद्र आणि राज्य सरकार अशा दोन्ही सरकारला हे पैसे जातात. त्यामध्ये राज्य सरकारच्या वाट्याला ९० रूपयांमधील ४० रूपये येत असल्याचा खुलासा त्यांनी केला. जीएसटीच्या मुद्द्यावरही राज्य सरकारकडून होणाऱ्या परताव्याच्या रकमेची माहिती देत त्यांनी सांगितले की केंद्राकडे राज्याची जी रक्कम आहे ती सुरक्षित आहे. ही रक्कम राज्याला थेट मिळते. पण काही रक्कम सुरक्षेसाठी केंद्र सरकारकडे असते ही बाब त्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिली. राज्यात कोरोना काळात सुरू असलेल्या खाजगी चाचण्यांचा भ्रष्टाचारदेखील त्यांनी निदर्शनास आणून दिला. एअऱपोर्टवर कोरोनाच्या काळात सरकारी चाचण्यांएवजी खाजगी चाचण्यांच्या भ्रष्टाचारावरही त्यांनी लक्ष वेधले. क्रिकेटपटूंना कोरोनाची चाचणी करण्यापासून शरद पवारांच्या मध्यस्तीनंतर सवलत देण्यात येते. पण माझी शरद पवारांची ओळख नाही. म्हणूनच दिल्लीतून येताना माझी गैरसोय झाली. चाचणीसाठी द्यायला पैसे नसल्यानेच मी याबाबत राजेश टोपे आणि मुंबई महापालिकेला याबाबतची विचारणा केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अजितदादांसोबतची मैत्री फक्त ७२ तासांची
अनिल देशमुख यांना मैत्रीचा दाखला देतानाच सुधीर मुनगंटीवार यांनी अजितदादांसोबतच्या मैत्रीचा उल्लेख केला. अजितदादा आणि आमची मैत्री ७२ तासांची होती असे मुनगंटीवार म्हणाले. दादांनी योग्य मार्गावर चालण्यासाठीची वाट दाखवणे हेच दोस्ती शब्दात आहे. बेईमानीच्या तत्वावर हे सरकार आले. बारामतीचे संशोधन मी वाचले या संशोधनात बटाटे आणि टॉमेटो एकाच झाडावर आणता येत असे संशोधन मी वाचले. त्यामुळे दक्षिण उत्तर ध्रुव एकत्र आणता येतात हे बारामतीकर करू शकतात असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

राष्ट्रपती राजवट लागू करण्याची वेळ आली : मुनगंटीवार
जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहातील एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. काही पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि वसतीगृहाबाहेरील पुरुष मंडळी वसतिगृहातील तरुणींना कपडे काढून नाचायला लावल्याचा व्हिडिओ जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला आहे. याचप्रकरणावर आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी खडाजंग पाहायला मिळाली. याप्रकरणातील पोलिसांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी भाजप आमदार श्वेता महाले यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करण्यात आली. तसेच जर अशाप्रकारे महाराष्ट्रात आमच्या आई-बहिणीची थट्टा होत असेल राष्ट्रपती राजवट लावावी, अशी मागणी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. पण यासंदर्भात अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हरकत घेऊन सुधीर मुनगंटीवार यांची ही मागणी कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली. तसेच पुन्हा हे भाष्य पुढील कामकाजात वापर नये, असं देखील मलिक यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे मुनगंटीवार यांचं राष्ट्रपती राजवटबाबतचं संबंधित वाक्य तपासून कामकाजातून काढून टाकण्यात येईल, असं विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी स्पष्ट केलं.

सुधीर मुनगंटीवार प्रचंड संताप व्यक्त करत म्हणाले की, ‘अतिशय गंभीर विषय सभागृहात उपस्थित केला आहे. अशा पद्धतीने तुमच्या माझ्या आई-बहिणाला नग्न करून नाचालया लावलं जातंय. त्याची फक्त आम्ही नोंद घेऊ का? इथे मृत मनाचे आमदार, मंत्री आहेत. पण आमचं मन जिवंत आहे. अशा घटनेमुळे तळ पायाची आग मस्तकात गेली पाहिजे. एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे, तो अहवाल आम्ही देतो, असं आम्हाला उत्तरामध्ये सांगितलं पाहिजे. फक्त नोंद घेतो नाही. तुम्हाला हे पाप फेडावं लागेल.’

मुनगंटीवार म्हणाले की, ‘आताची घटना असून पोलिसांकडे याबाबत माहिती असूनही आता जाऊन चौकशी करायची नाही आहे? १५ हजार कोटी खर्च केल्यानंतर पोलीस यंत्रणा जर माहितीच घेतं नसेल तर कशासाठी सरकार? राष्ट्रपती राजवट लावावी लागेल. या सरकारवर राष्ट्रपती राजवट आणायची वेळ आली आहे. मी संविधानाचा सन्मान करणारा व्यक्ती आहे. पण तुम्ही १०१ पाप केली त्यामुळे आता राष्ट्रपती राजवट शिवाय पर्याय नाही. आमच्या आई-बहिणीची थट्टा केली जात असेल तर राष्ट्रपती राजवट हा एकच मार्ग आहे.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button