राजकारण

राज्यातील कठोर निर्बंध आणखी १४ दिवस वाढण्याची शक्यता

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येचा वेग थोडा कमी झाला असला तरी मात्र, मृतांचा आकडा चिंतेत भर टाकणारा आहे. तसेच आता लागू करण्यात आलेल्या कडक निर्बंधांमुळेच बाधितांच्या संख्येला ब्रेक लागू शकला आहे. त्यामुळे कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी आता पुढील आणखी काही दिवस राज्यात कठोर निर्बंध लागू करण्यात यावेत अशी भूमिक राज्य सरकारमधील अनेक मंत्र्यांनी घेतली आहे.

राज्य मंत्रिमंडळाची बैठक उद्या म्हणजेच २८ एप्रिल २०२१ रोजी होणार आहे. या बैठकीत लॉकडाऊन वाढवण्याच्या संदर्भातील निर्णय घेण्यात येणार आहे. बहुतेक कॅबिनेट मंत्री यांनी सध्या सुरू असलेला राज्यातील लॉकडाऊन कालावधी १४ दिवस वाढवावा अशी भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री यांची भूमिका लॉकडाऊन कालवधी वाढवावा अशीच भूमिका मांडत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोरोनाबाधितांची संख्या मुंबईत कमी होत आहे. पण राज्यातील इतर शहरांत अद्याप कोरोनाबाधितांची संख्या जास्त आहे. यामुळे सध्याच्या लॉकडाऊन कालवाधी पुन्हा वाढवण्याचे संकेत मंत्री विजय वडेट्टीवार यांनीही दिले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button