इतर

एसटी बस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच : अनिल परब

मुंबई : राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता सरकारकडून निर्बंध अधिक कडक केले जात आहेत. या पार्शभूमीवर आज राज्याच परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना एक महत्वपूर्ण माहिती दिली. एसटी बसेस केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार असल्याचं त्यांनी सांगितलं

परब म्हणाले जिल्हांतर्गत, जिल्ह्याबाहेर देखील चालतील परंतु त्या केवळ अत्यावश्यक सेवेसाठीच चालणार आहेत. या संदर्भात एसटीचा संपूर्ण कार्यक्रम कसा असेल? याची चर्चा करण्यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीनंतर अंतिम निर्णय होईल. परंतु आता सरकारने ज्या काही गाइडलाइन्स दिलेल्या आहेत, त्यानुसार दोन्ही ठिकाणी एसटी चालतील फक्त या एसटी बस अत्यावश्यक सेवेसाठीच चालतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button