एमटीव्हीवर ६ मार्चपासून लोकप्रिय डेटिंग फ्रँचायझीचे १३वे पर्व
'एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स३'सह पहा प्रेमाच्या दोन बाजू
नवी दिल्ली : ‘प्रेम काय आहे?’ प्रेम म्हणजे योग्य जोडीदार शोधण्याबाबत आहे का की प्रेम हे संधी साधण्याबाबत आहे? प्रेम म्हणजे उत्साहपूर्ण गोष्टींमध्ये सामावून जाणे आहे की प्रेम म्हणजे आजीवन रोमँटिक क्षणांचा आनंद घेण्याबाबत आहे? खरेतर, या अनादिकाळापासूनच्या प्रश्नांची नेहमीच आपल्या जीवनामध्ये कोणत्या-ना-कोणत्या रूपात उत्तरे मिळाली आहेत. आणि याचे उत्तर तुम्हाला आता देखील मिळणार आहे, कारण तुमची पसंती कोणीही असो, ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला’मध्ये प्रेमाचा नेहमीच गाजवाजा होतो.
प्रेम, नाते आणि त्यादरम्यान येणा-या प्रत्येक गोष्टीला अभूतपूर्व ट्विस्टसह पुनर्परिभाषित करत एमटीव्ही हे भारताचे पहिल्या क्रमांकाचे युथ एंटरटेन्मेंट चॅनेल त्यांचा मार्की डेटिंग रिअॅलिटी शो ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स३’च्या १३व्या पर्वासह परतले आहे. या रिअॅलिटी शोला फिलिप्स हेअर केअर, मॅनफोर्स, डेन्वर डिओडरण्ट्स आणि ओएनएन पोलोस अॅण्ड टीज यांचे पाठबळ मिळाले आहे. ६ मार्चपासून दर शनिवारी सायंकाळी ७ वाजता नवीन सीझन पहिल्यांदाच ‘प्रेमाच्या दोन बाजू’ सादर करत रोमांस, साहस, आवड यांच्या तडक्याची भर करेल.
केरळमधील पूवर आयलँड्सच्या नयनरम्य ठिकाणी अगदी योग्य परिसर व योग्य वातावरणामध्ये शूट करण्यात आलेल्या ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स३’मध्ये ९ मुले व १२ मुली एक नव्हे तर दोन वेगवेगळे व्हिलाज: सिल्व्हर व गोल्डमध्ये त्यांच्या प्रेमाचा शोधाचा अनोखा प्रवास सुरू करतील. सिल्व्हर व्हिलामध्ये स्पर्धक सर्व लेबल्स काढून कोणतीही कटिबद्धता किंवा ”टॅग्स”मागील नात्यांचा शोध घेताना दिसतील, तर गोल्ड व्हिलामध्ये कटिबद्धता महत्त्वाची असेल. एकीकडे प्रेम खोडकर असेल, तर दुसरीकडे ते सुरेख असेल.
तुम्हाला याबाबत समजण्यापूर्वीच फासे बदलले असतील. व्हिलाजमधील बदलत्या डायनॅमिक्ससह खेळामधील समीकरणे बदलतील, ज्यामुळे स्पर्धकांमध्ये शेवटपर्यंत स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी चढाओढ होताना पाहायला मिळेल. मोहक जोडी रणविजय सिंग आणि सनी लियोनी मनोरंजनाचा स्तर उंचावण्यासाठी आणि ”आधुनिक प्रेमाचा” शोध घेण्यासाठी आणखी एका लक्षवेधक प्रवासासह सातव्यांदा सूत्रसंचालकांच्या भूमिकेत परतले आहे. १३वे पर्व सुरू होण्यासाठी सज्ज असलेला ओजी रणविजय सिंग म्हणाला, ”वर्षानुवर्षे एमटीव्ही स्प्लिट्सविलाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि तरुणांचे हृदय व मनामध्ये खास स्थान निर्माण केले आहे. नवीन थीम्स व आव्हानांसह स्पर्धकांचा वैविध्यपूर्ण समूह प्रत्येक पर्वामध्ये प्रेमावरील विभिन्न पैलूंना सादर करतो आणि माझा विश्वास आहे की, हीच विविधता शोला पुढे जाण्यामध्ये आणि जनरेशन झेडचे लक्ष वेधून घेण्यामध्ये कारणीभूत ठरते. अद्वितीय वर्षानंतर आम्ही धमाल व उत्साहाचा स्तर दुप्पट करण्याचा प्रयत्न करत आहोत, जे आमच्या थीममधून देखील दिसून येत आहे. शोला मिळालेले प्रेम व पाठिंब्यासाठी आम्ही चाहत्यांचे जितके आभार मानू ते कमीच आहे. सनी आणि मी आणखी एका संस्मरणीय पर्वासाठी उत्सुक आहोत.”
अत्यंत उत्साही व मोहक सनी लियोनी म्हणाली, ”माझ्या मते, स्प्लिट्सविला या शोने जनरेशन झेडसाठी डेटिंग व नात्याला पुनर्परिभाषित केले आहे. प्रेमासंबंधी आपल्या निवडी व पैलू सतत सर्वसमावेशक होत असताना अर्थपूर्ण नाते निर्माण होण्याचा विचार या शोचे सार कायम ठेवतो. अनेक पर्वांमध्ये रणविजय व मला सर्वात वैविध्यपूर्ण व उत्साही व्यक्तींना भेटण्याचा आणि त्यांना प्रेमाच्या शोधामध्ये मार्गदर्शन करण्याचा निखळ आनंद मिळत आला आहे. आम्ही एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स३सह आणखी एका संपन्न प्रवासामध्ये याच उत्साहाची पुनरावृत्ती करण्यास उत्सुक आहोत. यंदाच्या थीममध्ये अनेक गोष्टी आहेत आणि निश्चितच प्रेक्षक शो कडे आकर्षित होतील. आम्ही एका उत्साहपूर्ण पर्वासाठी सज्ज आहोत.”
एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स३ ने डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीला पहिल्यांदाच लाइव्ह ऑडिशन्स सुरू केले आणि प्रेक्षकांनी या गोष्टीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच मोहक सौंदर्यवती नेहा धुपिया व विद्या मलावदे या देखील यामध्ये सामील झाल्या आणि त्यांनी स्पर्धकांना प्रोत्साहित केले. ऑनलाइन ऑडिशन्समध्ये मुंबईकर समृद्धी जाधव व व्योमेश कौल यांनी शोमध्ये प्रवेश मिळवला आणि ते या अनोख्या स्पर्धेमध्ये इतर स्पर्धकांसोबत स्पर्धा करताना दिसतील.
गोल्ड वि. सिल्व्हर – संघर्ष लवकरच सुरू होणार आहे. आता तुमची बाजू कोणती हे ठरवण्याची वेळ आली आहे, जेथे फिलिप्स हेअर केअर, मॅनफोर्स, डेन्वर डिओडरण्ट्स आणि ओएनएन पोलोस अॅण्ड टीजचे पाठबळ असलेला शो ‘एमटीव्ही स्प्लिट्सविला एक्स३’ सुरू होत आहे ६ मार्चपासून सायंकाळी ७ वाजता फक्त एमटीव्हीवर.