मनोरंजन

संगीतकार बप्पी लाहिरींना कोरोनाची लागण

मुंबई : भारतात पुन्हा एकदा कोरोनाने तीव्र रुप धारण केले आहे. यावेळी कोरोनाने बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला आहे. आता जेष्ठ गायक-संगीतकार बप्पी लाहिरी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन, आमीर खान, परेश रावल, आर माधवन, रणबीर कपूर हे सेलिब्रेटी अलीकडेच कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. आता संगीत दिग्दर्शक बप्पी लाहिरी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. बप्पी लहरी यांच्या वतीने त्यांच्या प्रवक्त्यांनी एक निवेदन शेअर केले आहे. प्रवक्त्याने सांगितले की, ‘शक्य ती सगळी खबरदारी घेतल्यानंतरही बप्पी यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.’ त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button