फोकस

मुंबई- पुणे दरम्यान विशेष डेक्कन एक्सप्रेस २६ जूनपासून प्रवाशांच्या सेवेत

मुंबई : पुणे विशेष डेक्कन एक्सप्रेस ट्रेनच्या सेवा व्हिस्टाडोम कोचसह २६ जूनपासून पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला आहे. या मार्गावर प्रथमच ही ट्रेन व्हिस्टाडोम कोचसह चालणार आहे.

मुंबई- गोवा मार्गावरील प्रवाशांना उपलब्ध असलेले व्हिस्टाडोम कोचमधील प्रवास करतानाचे पश्चिम घाटाचे अनुभव आता मुंबई-पुणे मार्गावरही उपलब्ध होतील. सध्या व्हिस्टाडोम कोच मुंबई -मडगाव जन शताब्दी विशेष ट्रेनमध्ये जोडलेला आहे. विस्टाडोम कोचच्या मूलभूत विशेष वैशिष्ट्यांमध्ये वाइड विंडो पॅन आणि काचेचे छप्पर (टॉप), फिरण्यायोग्य खुर्ची आणि पुशबॅक खुर्च्या आदींचा समावेश आहे. विशेष डेक्कन एक्स्प्रेस २६ जूनपासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दररोज सकाळी ७ वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी ११.०५ वाजता पुण्याला पोहोचेल.

डेक्कन एक्स्प्रेस विशेष २६ जूनपासून दररोज दुपारी ३.१५ वाजता पुण्याहून सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे त्याच दिवशी संध्याकाळी ७.०५ वाजता पोहोचेल. केवळ आरक्षण तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button