Top Newsराजकारण

सोमय्यांनी भ्रष्टाचाराविषयी आवाज जरूर उठवावा, मात्र नौटंकी करू नये : अनिल परब

नाशिक : किरीट सोमय्या यांनी आरोप करण्यापूर्वी माहितीची शहानिशा करणे गरजेचे आहे. त्यांनी भ्रष्टाचाराविषयी जरूर आवाज उठवावा, मात्र सगळ्यांचेच भ्रष्टाचार बाहेर काढले पाहिजे. उगाच राजकीय नौटंकी करू नये, असा आरोप करीत सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला नसल्याचा दावा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला.

मालेगाव येथील एका कार्यक्रमासाठी जाण्यापूर्वी त्यांनी नाशिकमध्ये शासकीय विश्रामगृहात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सोमय्या यांच्यावर थेट टीका केली. भ्रष्टाचारप्रकरणी आलेल्या माहितीची अगोदर शहानिशा करून त्यांनी आरोप केले पाहिजेत आणि खरेच त्यांना भ्रष्टाचार उघड कारायचे असतील तर त्यांनी इतर लोकांच्या भ्रष्टाचारावरदेखील बोलेल पाहिजे. हा माझा, हा त्याचा असे करून राजकीय नौटंकी करू नये, असा सल्ला त्यांनी दिला.

सोमय्या यांच्यावरील कथित हल्ल्याविषयी बोलताना परब यांनी घटनेनंतर मला याबाबतची माहिती मिळाली, असे सांगताना त्यांना शारीरिक अशी कोणतीही मारहाण शिवसैनिकांनी केलेली नाही. ते स्वत: पायरीवरून पडले असे प्रथमदर्शनी समोर येत आहे. तपासात सत्य समोर येईलच. कोणत्याही घटनेचे राजकारण करण्यापेक्षा वस्तुस्थिती तपासली पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

मिळालेल्या माहितीची सत्यता पाहूनच त्यांनी बोलले पाहिजे, त्याविषयी त्यांनी इतरांचेदेखील म्हणणे ऐकले पाहिजे, असा सल्ला देतानाच राजकीय हेतूने आरोप केले जात असल्याचा पुनरुच्चार केला.

मला मारण्याचा हेतू होता, सोमय्यांचा शिवसेनेवर आरोप

पुणे महानगरपालिका मुख्यालयात शिवसेनेचा मला मारण्याचा हेतू होता असा घणाघाती आरोप भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला आहे. ५ फेब्रुवारीला किरीट सोमय्या पुणे दौऱ्यावर होते. पुणे महानगरपालिकेत निवेदन देण्यासाठी जात असताना सोमय्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. या वेळी सोमय्या पालिकेच्या पायऱ्यांवर कोसळले त्यांच्या हाताला आणि कंबरेला मुका मार लागला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. दरम्यान तो मला मारण्याचा प्रयत्न होता असा आरोप सोमय्यांनी शिवसेनेवर केला आहे. तसेच हल्ला करणाऱ्या त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी सोमय्यांनी केली आहे.

भाजप खासदार किरीट सोमय्या शनिवार ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पुणे दौऱ्यावर होते. पुण्यातील एका कोविड सेंटरमध्ये सुरु असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात तक्रार करण्यासाठी आणि पालिकेत निवेदन देण्यासाठी सोमय्या पुणे महानगरपालिकेत गेले होते. यावेळी सोमय्यांच्या गाडीचा ताफा अडवण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी सोमय्यांच्या गाडीच्या दिशेने काहीजणांनी दगडफेक केली आहे. सोमय्या यांनी एक दगड फेक करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. शिवसेनेचा मला मारण्याचा प्रयत्न होता असं दगडफेकीवरुन किरीट सोमय्या म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button