अर्थ-उद्योगतंत्रज्ञान

स्नॅप आयएनसी भारतातील १०० दशलक्ष स्नॅपचॅटर्सपर्यंत पोहोचणार

मुंबई : स्नॅप आयएनसीने आज भारतीय भागीदार, निर्माते, ब्रँड्स, स्टोरीटेलर्स आणि स्नॅपचॅटर्सच्या वाढत्या समुदायाचा आनंद साजरा करण्यासाठी स्नॅप इन इंडियाच्या दुसऱ्या आवृत्तीचे ऑनलाइन आयोजन केले.

या उपक्रमात स्नॅपचे सह-संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी इवान स्पेजेल यांनी भारतात मासिक १०० दशलक्ष स्नॅपचॅटर्सचा टप्पा पार करण्याची घोषणा केली आणि स्नॅप टीमने भारतात सातत्याने हाती घेतलेल्या स्थानिकीकरणाचे प्रयत्न व नावीन्यपूर्णता यांचा आढावा घेतला.

 

आम्ही भारतीय समाजासाठी स्नॅपचॅटचा अनुभव स्थानिकीकृत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. आम्ही अत्यंत कार्यरत आणि कलात्मक स्थानिक निर्माता समुदायाला समाविष्ट केले आहे आणि स्थानिक उत्पादने, मार्केटिंग उपक्रम आणि भाषिक सहकार्यात गुंतवणूक केली आहे, असे मत इव्हान स्पेजेल यांनी व्यक्त केले.

भारतीय स्नॅपचॅटर्ससाठी एक स्थानिकीकृत अनुभव देण्याच्या या प्रयत्नांचा पाठपुरावा करत असताना आम्ही आता भारतात मासिक स्तरावर १०० दशलक्ष स्नॅपचॅटर्सपर्यंत पोहोचत आहोत. आम्ही स्थानिक संस्कृती आणि बुद्धिमत्ता यांचा उत्सव साजरा करण्याकडे आणि त्याचवेळी आमच्या भारतीय निर्मात्यांच्या समाजाचे सक्षमीकरण करणे, वाढवणे आणि त्यांना स्त्रोत देण्याकडे आमचे प्रयत्न सुरू ठेवू.

स्नॅपचे सह-संस्थापक आणि मुख्य तंत्रज्ञान अधिकारी बॉबी मर्फी यांनी कंपनीला भागीदार, निर्माते आणि देशभरातील स्नॅपचॅटर्सपर्यंत पोहोचण्यास मदत करणाऱ्या ऑगमेंटेट रिअलिटी (एआर) अनुभवांच्या महत्त्वाला अधोरेखित केले. भारतातील स्नॅपचॅटच्या उत्पादनांच्या केंद्रस्थानी ऑगमेंटेड रिअलिटी आहे. आम्ही सातत्याने सांस्कृतिक दृष्टीने सुसंगत राहण्यासाठी आणि खास एआर अनुभव देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यामुळे आम्ही १०० दशलक्ष भारतीय स्नॅपचॅटर्सपर्यंत पोहोचू शकलो आहोत. आम्ही कार्यशाळा आणि लेन्साथॉन्सच्या माध्यमातून विद्यार्थी आणि तरूणांना अत्यावश्यक एआर कौशल्याद्वारे सक्षमीकृत करण्यासाठी काम केले आहे” असे बॉबी मर्फी म्हणाले. आमचे उद्दिष्ट स्नॅपचॅटर्सना उपलब्ध असलेले अनुभव वाढवण्याच्या हेतूने भारतातील जास्तीत-जास्त स्थानिक निर्मात्यांसोबत भागीदारी करण्याचे आहे. स्नॅपमध्ये आम्ही एआर अधिक सहजसाध्य, उपयुक्त आणि आधीपेक्षा जास्त प्रत्यक्ष करण्यावर भर देतो.

स्नॅपची भारतातील प्रमुख वैशिष्टे २०२१

– धोरणात्मक ब्रँड भागीदारीची निर्मिती
– स्नॅपच्या भागीदारांनी भारतासाठी स्थानिकीकृत अनुभवाच्या विकासात एक महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
– स्नॅपने भारतातील देशांतर्गत इ-वाणिज्य वेबसाइट फ्लिपकार्टसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे आणि त्यामुळे नावीन्यपूर्ण एआर अनुभव ई-वाणिज्यसाठी विकसित करता येतील. ही स्नॅपसाठी भारतातील पहिली इ-वाणिज्य भागीदारी असेल आणि स्नॅपचा कॅमेरा किट (Camera Kit) हा फ्लिपकार्टच्या ”कॅमेरा स्टोअरफ्रंट”चा अविभाज्य घटक असेल. या भागीदारीद्वारे ग्राहकांना स्नॅपचॅट एआरद्वारे आपली खरेदी आणि इवाणिज्य सहभागाचा प्रवास सुरू करता येईल. त्यामुळे ही प्रक्रिया त्यांना त्यांच्या घरातून सुलभपणे करता येईल.
– स्नॅप स्नॅपचॅटर्ससाठी व्हर्चुअल ट्राय ऑन शक्य करत आहे. जसे शुगर कॉस्मेटिक्स आणि मायग्लॅम यांनी स्नॅप एआरच्या शॉपिंग बीटा प्रोग्रामचा अंगीकार व्हर्चुअल ब्युटी आणि मेकअप ट्रायऑन अनुभव ग्राहकांसाठी देण्यासाठी केला आहे.
– सॅमसंग मोबाइलने एक खास ”फन मोड” फीचर आणले आहे. त्यातून स्नॅपच्या काही एआर-शक्तिशाली लेन्सेस त्यांच्या स्थानिक कॅमेरा अ‍ॅपमध्ये आणल्या जातात आणि ही भागीदारी त्यांच्या ”मेड इन इंडिया” एम सीरिज स्मार्टफोन्सद्वारे पुढे आणली आहे.

भारत ही आता पहिली आणि एकमेव बाजारपेठ ठरली आहे, जिथे स्नॅपचॅटने सर्व सर्वोच्च दर्जाच्या अँड्रॉइड ओईएमसोबत वितरण भागीदारी केली आहे (ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरर्स). त्यात भारतभरात १०० दशलक्षपेक्षा जास्त उपकरणे आहेत. या उपकरणांवर स्नॅपचॅट आधीच इन्स्टॉल करून स्नॅपने नवीन उगवत्या स्नॅपचॅटर्सचा त्रास कमी केला आहे आणि त्यांना आपल्या मित्रांसोबत व्हिज्युअल पद्धतीने संवाद साधण्यासाठी एक नवीन माध्यमाच्या स्वरूपात या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे.

स्नॅप मॅप हा प्रत्येक स्नॅपचॅटरच्या आसपासच्या परिसरासाठी एक वैयक्तिक मॅप आहे आणि तो लोकांना तसेच जागा जोडतो. त्याने झोमॅटोसोबत भागीदारी केली आहे. ही भारतातील पहिली स्नॅपचॅट भागीदारी आहे आणि त्यांना रेस्टॉरंटची माहिती पाहता येईल. तसेच, त्यांना स्नॅपचॅटवर आपल्या वैयक्तिक मॅपवरून फूड ऑर्डर्स देता येतील.

स्नॅपकडून भारतात एक मोफत, सुरूवातीच्या टप्प्यातील संस्थापकावर आधारित उपक्रम चालवला जाईल: यलो ट्री बूटकॅम्प. हा कलात्मकता व तंत्रज्ञानाचा एक संगम असेल आणि स्नॅप तसेच भारतीय स्टार्टअप समाजातील तज्ञांना निधी उभारणे, कार्यान्वयन, वाढ यांच्याबाबत चर्चा करणे आणि स्नॅप किट व स्नॅपचॅट एड्स मॅनेजर यांच्यासारख्या साधनांचा वापर वाढीसाठी कशा प्रकारे करणे हे समजून घेणे शक्य होईल.

भारत हे बिट इमोजी या स्नॅपच्या पर्सनलाइज्ड इमोजी अ‍ॅपसाठीची दुसऱ्या क्रमांकाची सर्वांत मोठी आणि वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. बिटइमोजी भारतात सातत्याने स्थानिकीकृत साहित्यासोबत बदलत आहे. २०२१ मध्ये होळीच्या काळात बिटइमोजी ”होली है” फिल्टर हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा स्नॅपचॅट जिओफिल्टर ठरला.

वनप्लस ९ आरसह निवडक वनप्लस मोबाइलमध्ये बिटइमोजी ”ऑलवेज ऑन डिस्प्ले” वैशिष्ट्य आहे. त्यामुळे वापरकर्त्याच्या वैयक्तिक बिटमोजी अवतारासोबत परिसरातील डिस्प्ले जिवंत करणे शक्य होते. जोश हा आघाडीचा भारतीय शॉर्ट व्हिडिओ अ‍ॅप असून त्यामुळे वापरकर्त्यांना व्हिडिओवर बिटमोजी स्टिकर्स जोडणे, बिटमोजीचा वापर प्रोफाइल पिक्चर म्हणून करणे आणि स्वतःला व्यक्त करण्यासाठी कमेंट विभागात वापरणे शक्य होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button