दहावीच्या निकालाची साईट क्रॅश !
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्याचे घोषित केले होते. परंतु, दुपारी ३ वाजले तरी अनेक विद्यार्थ्यांना निकालच पाहता आला नाही. एकाच वेळी अनेक विद्यार्थ्यांनी निकाल पाहण्यासाठी संकेतस्थळाला भेट दिल्याने साईट क्रॅश झाली.
निकाल पाहता येत नसल्याच्या तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून केल्या जात होत्या. याबाबत राज्य मंडळाच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला असता; येत्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये साइट पूर्ववत सुरू होईल. त्यांनतर सर्व विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल, असे त्यांनी सांगितले.
दरवर्षी एमकेसीएल सह इतर संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिले जातात. त्याचप्रमाणे मोबाइलवर एसएमच्या माध्यमातून निकाल पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाते. परंतु यंदा केवळ एकच संकेतस्थळ निकाल पाहण्यासाठी दिले होते. राज्यतील १६ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळाला भेट दिल्याने त्यावर ताण आला.
राज्य माध्यमिक शालांत म्हणजे दहावीच्या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांसाठी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. राज्याचा एकूण निकाल ९९ .९५ टक्के लागला आहे. त्यामध्ये, कोकण विभाग १०० टक्के निकाल लागला असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे.