सिग्निफायकडून भारतामध्ये फिलिप्स मोशन सेन्सिंग टी-बल्ब लाँच
नवी दिल्ली : सिग्निफाय (युरोनेक्स्ट: LIGHT) या प्रकाशयंत्रणेमधील जागतिक अग्रणी कंपनीने भारतामध्ये फिलिप्स मोशन सेन्सिंग टी-बल्ब लाँच केला आहे. या बल्बमधील उच्च दर्जाच्या इनबिल्ट मोशन सेन्सरसह ६ मीटरच्या अंतराअंतर्गत हालचाल जाणवल्यास लाइट आपोआपपणे बदलते. अधिक सुरक्षिततेसाठी बल्ब कोणतीही कृती न जाणवल्यास प्रथम २ मिनिटांनंतर इका-मोडमध्ये बदलत अंधुक होतो आणि त्यानंतर देखील कृती न जाणवल्यास ३ मिनिटांनंतर पूर्णपणे बंद होतो. ऑटोमॅटिक स्विच-ऑन फंक्शनसह हा बल्ब बाल्कनी, जिने, वॉशरूम्स आणि पार्किंग क्षेत्रे अशा घरातील वीजेचा कमी वापर होणा-या भागांसाठी सोईस्कर लाइटिंग सोल्यूशन देतो.
अद्वितीय टी-आकार पारंपारिक वक्राकार आकाराच्या बल्बच्या तुलनेत अधिक जागेपर्यंत प्रकाश पसरवतो आणि त्यामधील अद्वितीय स्विवेल अॅक्शन उत्तम फोकससाठी सुलभ समायोजनाची सुविधा देते. हा बल्ब विद्यमान बल्ब होल्डर्समध्ये फिट बसू शकतो आणि कृती न जाणवल्यास ५ मिनिटांनंतर आपोआपपणे बंद होत असल्यामुळे वीजेची बचत होण्यामध्ये मदत होते.
या लाँचबाबत बोलताना सिग्निफायच्या दक्षिण आशियामधील कार्यसंचालनांचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक सुमित जोशी म्हणाले, आम्हाला भारतातील ग्राहकांसाठी आमचा फिलिप्स मोशन सेन्सिंग टी-बल्ब लाँच करण्याचा आनंद होत आहे. अद्वितीय टी-आकार आणि उच्च दर्जाच्या मोशन सेन्सरसह हा बल्ब घरातील वीजेचा कमी होणा-या भागांसाठी सोईस्कर ऑटोमेटेड लाइटिंग सोल्यूशन आहे. तसेच ग्राहकांच्या अधिक सुरक्षिततेसाठी आम्ही उत्पादनाला अशाप्रकारे डिझाइन केले आहे की, कोणतीही कृती न जाणवल्यास बल्ब २ मिनिटांनी अंधुक होतो आणि आणखी ३ मिनिटांनंतर पूर्णपणे बंद होतो.
फिलिप्स मोशन सेन्सिंग टी-बल्ब भारतामध्ये १२ वॅट, ११०० ल्यूमेन्स पॅकमध्ये उपलब्ध आहे आणि १,३९९ रूपये या एमआरपी किंमतीमध्ये सर्व लहान व मोठ्या आकाराचे रिटेल स्टोअर्स आणि ई-कॉमर्स व्यासपीठांवर उपलब्ध असेल.