राजकारण
संजय राऊतांची ‘डिनर डिप्लोमसी’!
महाराष्ट्रातील सर्व खासदारांना निमंत्रण; भाजप खासदारांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/03/sanjay-raut-480x405.jpg)
नवी दिल्ली : महाराष्ट्रात राजकीय घडामोडी वेगाने घडत असताना दिल्लीत शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. राऊत यांनी महाराष्ट्रातील सर्व खासदारांना स्नेहभोजनाचे आमंत्रण दिले आहे. आता भाजप खासदारही डिनरला उपस्थित राहणार का, याकडे लक्ष लागलं आहे.
’संजय राऊत यांच्या दिल्लीतील 15, सफदरजंग लेन’ या निवासस्थानी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय राऊत यांचे कुटुंबही दिल्लीतील निवासस्थानी आहे. प्रसिद्ध गायिका मैथिली ठाकूर यांच्या संगीत मैफलीचेही आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार शरद पवार कुटुंबियासह उपस्थित राहणार आहेत. मात्र भाजपचे शिवसेनेशी संबंध बिघडलेले असल्यामुळे भाजपचे खासदार डिनरला उपस्थित राहणार का? याबाबत उत्सुकता आहे.