राजकारण

मामी गप्प बसा…! शिवसेना आ. मनीषा कायंदेंचा अमृता फडणवीसांना प्रतिटोला

मुंबई – शिवसेना नेते आणि खा. संजय राऊत यांनी भाजप नेते आणि केंद्र सरकारविरुद्ध रणशिंग फुंकले असून, आज भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यास आता भाजप नेत्यांकडून प्रत्युत्तर दिले जात आहे. यातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांना खोचक टोला लगावला होता. त्यावर, आता शिवसेनेच्या महिला नेत्यानं ट्विट करुन प्रतिटोला लगावला आहे.

शिवसेनेच्या आ. डॉ. मनिषा कायंदे यांनी ट्विट करुन अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय. ”शेर की दहाड से डरी हूई बिल्लीया आवाज निकालने की कोशीष कर रही है। मामी गप्प बसा!” असे ट्विट कायंदे यांनी केलं आहे. तत्पूर्वी अमृता फडणवीस यांनीही शिवसेनेला मांजर म्हटलं होतं.

काय म्हणाल्या होत्या अमृता फडणवीस

संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर अवघ्या काही वेळातच अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत या सगळ्यावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “आज फिर एक बिल्ली ने दहाड़ने की कोशिश की है!”, असे केवळ एका ओळीचे ट्विट करत अमृता फडणवीस यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button