राजकारण

खंडणी जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये : आ. नितेश राणे

मुंबई : अयोध्येतील राम मंदिर जमीन खरेदी व्यवहारात झालेल्या कथित घोटाळ्याच्या आरोपावरून देशभरात राजकारण सुरु झालं आहे. राम मंदिरासाठी खरेदी केलेल्या जमिनीचे अवघ्या १० मिनिटांत २ कोटींचे साडे १८ कोटी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. समाजवादी पक्ष आणि आम आदमी पक्षाने याबाबत पत्रकार परिषद घेत राम मंदिर ट्रस्टवर घोटाळ्याचा आरोप केला आहे. त्यामुळे हे प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. यावर शिवसेनेनंही भाष्य केले होते. त्यावरून भाजपा आमदार नितेश राणेंनी त्यांना टोला लगावला आहे.

आमदार नितेश राणे यांनी ट्विट करून म्हटलंय की, जय भवानी, जय शिवाजी, टाक खंडणी असं बोलून पैसे जमा करणाऱ्या शिवसेनेने राम मंदिरावर बोलूच नये. लायकीत राहावे अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर शरसंधान साधलं आहे.

अयोध्येतील राममंदिर उभारणीचे काम आणि त्यामागचा व्यवहार पारदर्शक, प्रामाणिक पद्धतीने व्हावा. रामभक्तांच्या श्रद्धेस तडा जाईल असे काही घडू नये ही अपेक्षा असतानाच जमीन व्यवहाराचे संशयास्पद प्रकरण समोर आले. ते खरे की खोटे याचा लगेच खुलासा झाला तर बरे! राममंदिर कार्य हे राष्ट्रीय अस्मितेचे कार्य आहे. या कार्याची कोणी जाणीवपूर्वक बदनामी करत असेल तर त्यांच्यावरही कारवाई होणे गरजेचे आहे. अयोध्येतील राममंदिर हे रामभक्तांचा त्याग, संघर्ष व बलिदानातून उभे राहिले. हाच इतिहास आहे. एखाद्या घोटाळ्याचा डाग त्या मंदिरावर पडत असेल तर पंतप्रधान मोदी, सरसंघचालक भागवतांना त्यात हस्तक्षेप करावाच लागेल, असा सल्ला शिवसेनेने दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button