राजकारण

शरद पवारांचे आजपासून ‘मिशन विदर्भ’

नागपूर : आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी आता सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही महानगरपालिका निवडणुकांची तयारी सुरु केलीये. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे आजपासून चार दिवस विदर्भाच्या दौऱ्यावर असणार आहेत. यादरम्यान ते नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.

शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर असतील. ते चार दिवसात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करतील. यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. आता त्याच गडात राष्ट्रवादी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. शरद पवार हे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास नागपुरात पोहोचतील. त्यानंतर ते व्यापाऱ्यांसोबत बैठक, पत्रकार परिषद आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील. शरद पवार यांच्या दौऱ्यामुळं विदर्भातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळणार आहे. तसेच, याने पक्षालाही बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे.

शरद पवारांचा चार दिवसांचा विदर्भ दौरा –

१७ नोव्हेंबर –

दुपारी १ वाजता – नागपूर विमानतळावर आगमन

दुपारी ३ ते ४ वाजता – हॉटेल सेंटर पॉईंट येथे पक्षाच्या नेत्यांसोबत चर्चा

दुपारी ४ वाजता – शरद पवार पत्रकार परिषद घेतील

संध्याकाळी ५ वाजता – राष्ट्रवादीचा मेळावा

१८ नोव्हेंबर –

सकाळी ८.३० वाजता – शरद पवार नागपूरहून निघतील

सकाळी ११.१५ वाजता – गडचिरोली जिल्ह्यातील देसाईगंज वडसा येथे पोहोचतील

सकाळी ११.३० वाजता – राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील

दुपारी २ वाजता – ते देसाईगंज वडसा येथून गडचिरोलीत येतील

दुपारी ३ वाजता – कार्यकर्त्यांच्या भेटी घेतील

दुपारी ४ वाजता – पत्रकार परिषद घेतील

संध्याकाळी ५.३० वाजता – चंद्रपूर जिल्ह्यातील मूळ येथे पोहोचतील आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील

रात्री ८ वाजता – ते चंद्रपुरात दाखल होतील आणि तिथेच मुक्काम करतील

१९ नोव्हेंबर –

सकाळी ९.३० वाजता – शरद पवार चंद्रपुरातील डॉक्टर, वकील आणि व्यावसायिकांशी चर्चा करतील

सकाळी ११ वाजता – चंद्रपूर शहरातील कार्यकर्त्यांची बैठक घेतील

सकाळी १२ वाजता – चंद्रपुरातील ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची बैठक घेतील

दुपारी १ वाजता – जनता हाय स्कूल येथे पत्रकार परिषद घेतील

सायंकाळी ५.३० वाजता – यवतमाळ येथे पोहोचतील

सायंकाळी ५.३० वाजता – कार्यकर्त्यांची बैठक घेतील

२० नोव्हेंबर –

सकाळी ९.३० वाजता – वसंत घुईखेडकर यांची भेट घेणार

सकाळी १० वाजता – पत्रकार परिषद घेणार

सकाळी १०.३० वाजता – कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार

दुपारी ३.१५ वाजता – वर्धा येथे पोहोचतील

दुपारी ३.३० वाजता – वर्धेत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतील

संध्याकाळी ५.३० वाजता – कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी

संध्याकाळी ६ वाजता – वर्धेहून निघतील

संध्याकाळी ७.३० वाजता – नागपूर विमानतळावर दाखल होतील

रात्री ८ वाजता – नागपूरहून मुंबईच्या दिशेने निघतील

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button