राजकारण

विदर्भाचा दौरा अर्धवट सोडून शरद पवार मुंबईत परतणार

नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या चार दिवसांच्या विदर्भ दौऱ्याला बुधवापासून सुरुवात झाली. मात्र आता शरद पवार यांचा वर्धा, यवतमाळ जिल्ह्याचा दौरा पुढे ढकलण्यात आल्याचे समोर येत आहे. १९ आणि २० नोव्हेंबर शुक्रवार, शनिवारी शरद पवार विदर्भातील वर्धा आणि यवतमाळ येथे दौरा करणार होते. माहितीनुसार चंद्रपूर दौरा करून शरद पवार मुंबईत पुन्हा परतणार आहेत. मात्र दौरा पुढे ढकलण्यामागचे कारण अस्पष्ट आहे.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने ‘मिशन विदर्भ’ सुरू केले होते. या मिशन अंतर्गत शरद पवार १७ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबरपर्यंत विदर्भ दौरा करणार होते. दौऱ्यादरम्यान नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा आढावा घेणार होते. आजपासून या मिशनला नागपूर येथून सुरुवात झाली. यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आणि नागपूर दौरा व्यवस्थित रित्या पार पडला. मात्र त्यानंतर आता शरद पवार यांचा वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील दौरा पुढे ढकलण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button