इतर

सचिन वाझे प्रकरणात सातवी गाडी जप्त

विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या NIA कोठडीत वाढ

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरणी NIAने क्राईम ब्रँचमधील अधिकाऱ्याला समन्स बजावल्याचे समोर आले आहे. हिरेन हत्या प्रकरणामध्ये क्राईम ब्रँचमध्ये काम केलेल्या या अधिकाऱ्याची संशयास्पद भूमिका आढळली आहे. या अधिकाऱ्याची नुकतीच बदली करण्यात आली होती. सचिन वाझेने या अधिकाऱ्याकडे फोन दिला होता आणि त्याला बिझी असल्याचे कारण द्यायला वाझेने सांगितले होते. दरम्यान, आज सचिन वाझे प्रकरणात सातवी गाडी जप्त केली आहे. कामोठेमधून आउडलँडर ही गाडी जप्त करण्यात आली आहे.

माहितीनुसार, ४ मार्च रोजी मनसुख हिरेन यांची हत्या करण्यात आली होती. तेव्हा हा अधिकारी पोलीस आयुक्तालयातील सीआययूच्या कार्यालयात होता. सचिन वाझेने आपला फोन त्याच्याकडे दिला होता आणि कोणाचा फोन आलाच तर तो रिसिव्ह करून वाझे ऑफिसमध्ये असून बिजी असल्याचे सांगायला सांगितले होते. याआधीही या अधिकाऱ्याची एटीएस (ATS)कडून चौकशी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. NIAला संशय आहे की, वाझे ठाण्याला गेला होता तेव्हा हा फोन या अधिकाऱ्याकडे मुद्दाम देण्यात आला होता.

दरम्यान आज NIAचे डीआयजी विधी कुमार NIA कार्यालयात पोहोचले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर भरलेली स्कॉर्पिओ स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाच्या तपासाची घेणार माहिती आहेत. बुधवारी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या याचिकेवर न उच्च न्यायालयाने तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोपी विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या NIA कोठडीत वाढ
मनसुख हिरेन हत्या प्रकरणी निलंबित पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी नरेश गोर या दोघांना अटक करण्यात आली होती. आज या दोघांची कोठडी संपल्यामुळे एनआयए (NIA)च्या विशेष कोर्टात हजर करण्यात असता दोघांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. ७ एप्रिलपर्यंत विनायक शिंदे आणि नरेश गोर यांच्या एनआयए कोठडीत वाढ केली आहे.

२१ विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांना एटीएसच्या पथकाने मनसुख हिरेन हत्याच्या गुन्हयात ठाण्यातून अटक केली होती. मनसुख हिरेन हत्येचा तपास एटीएसकडून एनआयएकडे वर्ग होताच दोघांचा ताबा एनआयए कडे देण्यात आला होता. विनायक शिंदे हा निलंबित पोलीस कॉन्स्टेबल असून त्याला २००७मध्ये झालेल्या लखनभैया कथित चकमक प्रकरणी तुरुंगात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. कोरोनाच्या काळात मे महिन्यात त्याला संचित रजा मिळाली होती. त्यानंतर विनायक शिंदे हा सचिन वाझे याच्या संपर्कात आला आणि वाझेच्या बेकायदेशीर कामात त्याला मदत करीत होता.
नरेश गोर हा ठाण्यातील क्रिकेट बुकी असून त्याने गुजरात राज्यातून तेथील एका कंपनीच्या नावावर १४ मोबाईल सीम कार्ड मिळवून वाझे च्या सांगण्यावरून विनायक शिंदेला दिले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button