आरोग्य

एसबीआय जनरल इन्शुरन्सचा कोविड-19 लसीकरण उपक्रमाला पाठिंबा

अल्प-उत्पन्न गटातील लाभार्थींच्या लशींचा खर्च उचलणार

मुंबई : एसबीआय जनरल इन्शुरन्स, ही सर्वसाधारण विमा उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांमधील अग्रगण्य कंपनी आहे. सीएसआर उपक्रमातंर्गत कोविड-19 लसीकरणात साह्य देण्याचा उद्देश कंपनी राबवते आहे. या कार्यक्रमातंर्गत एसबीआय जनरलच्या वतीने महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशमधील अल्प-उत्पन्न गटाकरिता कोविड-19 लसीच्या दोन शॉटचा खर्च उचलण्यात येणार आहे.

आजपासून या उपक्रमाची सुरुवात झाली असून या मोफत कोविड-19 लसीकरणाद्वारे 37,000 हून अधिक वरिष्ठ नागरीक आणि 45 वर्षांच्या वरील व्याधीग्रस्त लाभधारकांना काही निवडक ठिकाणी, जसे की उस्मानाबाद, रायगड, पालघर, जळगाव, लातूर, अहमदनगर, यवतमाळ आणि चंद्रपूरचा उप-जिल्हा, मुंबई बाहेरील भाग, पुण्याचा बाहेरील भाग, नागपूरचा बाहेरील भाग, महाराष्ट्रात तसेच आंध्र प्रदेशातील अमरावती (विजयवाडा पट्टा).

एसबीआय जनरल इन्शुरन्स एमडी आणि सीईओ पीसी कंडपाल म्हणाले की, “एसबीआय जनरल इन्शुरन्समध्ये, आम्ही सर्वात कठीण परिस्थितीमध्ये आयुष्य व्यक्तीत करणाऱ्या गटासाठी तसेच जोखीमचे जीवन जगणाऱ्या आणि शाश्वत हस्तक्षेपाची गरज असणाऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यात साह्य करतो. आमच्या या मोहिमेसोबतच सरकारच्या कोविड-19 लसीकरणात खारीचा वाटा उचलण्याचा आमचा प्रयत्न आहे. या मोहिमेतंर्गत समाजातील दुर्बल घटकांपर्यंत पोहोचून त्यांना खासगी रुग्णालयांत लसीचे दोन शॉट उपलब्ध करून देणार आहोत. लवकरात लवकर समाजातील गरजू घटकांकरिता उपक्रम राबवून लसीकरणाला चालना देण्याचे आमचे ध्येय आहे. ज्यामुळे कोरोना विषाणूचा फैलाव होण्यापासून रोखण्यात मदत होईल.”

या लसीकरण उपक्रमाचा लाभ समाजातील दुर्बल घटकांपर्यंत अधिकाधिक पोहोचविण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे महासाथीचे गांभीर्य लक्षात घेऊन, प्रामुख्याने महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात जास्तीत-जास्त लोकांचे कोविड-19 लसीकरण करण्याचे ध्येय गाठण्यासाठी सज्ज असलेली एसबीआय जनरल इन्शुरन्स ही पहिली कॉर्पोरेट ठरली. सध्याच्या काळजी गरज ओळखून समाजाला साह्य म्हणून या उपक्रमामार्फत मदतीचा हात पुढे केला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button