राजकारण

संजय राठोडांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर

मुंबई : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावे लागलेले संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी 28 फेब्रुवारीला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे दिला होता

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणामुळे अडचणीत आलेले राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना आमदार संजय राठोड यांच्या गच्छंतीवर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. गेल्याच आठवड्यात संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला होता. या राजीनाम्यावर मुख्यमंत्र्यांनी सही केली.

अनेक दिवस उलटूनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा राज्यपालांकडे न पाठवल्याने भाजपकडून टीका करण्यात आली होती. ठोडांचा राजीनामा फक्त दिखाव्यापुरता आहे का? राठोडांचा राजीनामा शिवसेना भवन किंवा मातोश्रीत फ्रेम करून ठेवला आहे का? असा खोचक सवाल भाजप आमदार संजय कुटे यांनी उपस्थित केला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button