परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास संजय पांडेंचा नकार

(DGP Sanjay Pandey writes letter to CM Uddhav Thackeray sites unable enquiry of Param Bir Singh)
मुंबई : पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची चौकशी करण्यास पांडेंनी असमर्थता दाखवली. ठाकरे सरकारने परमबीर सिंह यांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्याकडे परमबीर सिंह यांच्या आरोपांचा तपास करण्याची जबाबदारी दिली होती. मात्र आता संजय पांडे यांनी चौकशी करण्यास असमर्थता दर्शवली आहे. त्यामुळे सरकारला त्यांच्याऐवजी दुसरा अधिकारी नेमावा लागेल. संजय पांडे हे वरिष्ठ आयपीएस अधिकारी असून नुकत्यात झालेल्या बदलीमुळे ते राज्य सरकारवर नाराज होते. संजय पांडे हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. मुंबई पोलीस आयुक्तपदावरुन परमबीर सिंग यांची होमगार्डच्या प्रमुखपदी वर्णी लागल्याने संजय पांडे यांना तुलनेने कमी महत्त्वाच्या असणाऱ्या राज्य सुरक्षा महामंडळाच्या प्रमुखपदी नेमण्यात आले, त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.