इतर
संजय पांडे यांच्याकडे पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार
मुंबई : वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडे यांना महाराष्ट्रच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत हा कार्यभार अँटी करप्शन ब्युरोचे महासंचालक रजनीश सेठ यांच्याकडे होता. साईड पोस्टिंगमुळे संजय पांडे नाराज होते. या संदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबत बैठकही झाली होती. तसंच संजय पांडे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिलं होतं. अखेर महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (9 एप्रिल) आदेश मंजूर करत राज्याच्या पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार संजय पांडे यांच्याकडे सोपवला. अतिशय शिस्तप्रिय, स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी अशी संजय पांडे यांची ओळख आहे.