नवी दिल्ली : समाजवादी पक्षाची ओळख आता धोक्यात आली आहे. कारण पक्षाची मान्यता संपुष्टात आणण्यासाठी सुप्रीम कोर्टात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भाजपा नेते आणि सुप्रीम कोर्टाचे वकील अश्वनी कुमार उपाध्याय यांनी ही याचिका दाखल केली आहे. कैरानामध्ये गुंड नाहिद हसन यांना तिकीट देऊन समाजवादी पक्षाने सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे या याचिकेत म्हटले आहे. फेब्रुवारी २०२१ मध्ये उत्तर प्रदेश पोलिसांनी नाहिद हसनसह त्यांची आई तबस्सुम आणि इतर ३८ जणांवर गँगस्टर कायद्याअंतर्गत कारवाई केली होती, मात्र तेव्हापासून ते फरार होते.
गँगस्टर कायद्याअंतर्गत फरार असलेले सपा आमदार नाहिद हसन यांनी शनिवारी कैराना न्यायालयात आत्मसमर्पण केले. नाहिद यांची आई तबस्सुम या भागातून खासदार राहिल्या आहेत. गेल्या वर्षी जानेवारीत हसनने कोर्टात आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर सुमारे महिनाभर ते तुरुंगात होते. नंतर त्यांना जामीन मिळाला होता.
यावर्षी जानेवारी महिन्यात यूपी पोलिसांनी नाहिद हसन, त्याची आई तबस्सुम आणि इतर ३८ जणांवर गँगस्टर कायद्यांतर्गत कारवाई केली. त्यानंतरही ते पुन्हा पळून गेले. मात्र शनिवारी शरणागती पत्करून सर्वांना आश्चर्यचकित केले.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अखिलेश यादव यांच्यावर अप्रत्यक्षरित्या हल्ला चढवला होता. ते म्हणाले होते की, समाजवादी पक्षाने कैराना आणि मुझफ्फरनगर, बुलंदशहर आणि लोणीमध्ये पलायन आणि माफियांना तिकिटं दिली आहेत, यावरून त्यांचा हेतू दिसून येतो. व्यावसायिक हिस्ट्रीशीटर्स आणि माफियांना तिकीट देऊन सत्तेवर आणणे आणि सत्तेला शोषणाचे प्रतीक बनवणे हे त्यांच्या तिकीट वाटपात दिसून येते, असे ते म्हणाले.