Top NewsUncategorized

उल्हासनगरात इमारतीचा पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळून ७ ठार

उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये रात्री १० च्या सुमारास एका इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील एका सदनिकेचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली. घटनेची माहिती कळताच ठाणे महानगरपालिकेची टीडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचत आहे. तोपर्य़त पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी काही प्रमाणात ढिगारा हटविला असून त्यातून सात जणांचे मृतदेह बाहेर काढले.

उल्हासनगर कॅम्प २ मधील साई शक्ती इमारतीत ही दुर्घटना घडली. या इमारतीमध्ये पाच मजले (तळ+५) आहेत. घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान व पोलीस कर्मचारी, रुग्णवाहिकेसह मदतीला धावले. सुरुवातीला ५ व्यक्तींचे मृतदेह सापडले होते, तर ३ ते ४ व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकल्या होत्या.

उल्हासनगरात १५ दिवसांपूर्वीची मोहिनी इमारतीचा स्लॅब कोसळून ५ जणांचा मृत्यू झाला होता. १० जण जखमी झाले होते. त्यानंतर दोन दिवसांत पुन्हा दोन इमारतीचे स्लॅब व प्लॅस्टर पडल्याने, इमारती सील केल्या आहेत. इमारत पडल्याची घटना नवीन असताना कॅम्प नं-२ परिसरातील साई शक्ती इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री १० वाजता घडली. या इमारतीमध्ये एकून २९ फ्लॅट असून यातील रहिवाशांची राहण्याची व्यवस्था थारासिंग दरबार येथे करण्यात येत आहे. परिसरात वीज पुरवठा खंडीत झाल्याने अंधाराचे साम्राज्य निर्माण झाले.

दुर्घटनेतील मृत पुढीलप्रमाणे : पुनीत बजोमल चांदवाणी (पु/वय १७ वर्ष), दिनेश बजोमल चांदवाणी (पु/वय ४० वर्ष), दीपक बजोमल चांदवाणी (पु/वय ४२ वर्ष), मोहिनी बजोमल चांदवाणी (स्त्री /वय ६५ वर्ष), कृष्णा इनूचंद बजाज (पु/वय २४ वर्ष), अमृता इनूचंद बजाज (स्त्री /वय ५४ वर्ष), लवली बजाज.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button