रोहित पवारांच्या ‘हाती’ भगवा ध्वज !
अहमदनगर : महाराष्ट्राच्या राजकारणात आजवर आपण भाजप, शिवसेना आणि मनसेकडून हिंदू वोट बँकसाठी भगव्याचं राजकारण होताना पाहिल जातंय. परंतु, आता यात राष्ट्रवादीची एन्ट्री झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी आपल्या मतदारसंघात भगवा ध्वज फडकावून नव्या दिशेकडे वाटचाल सुरू केली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात भगव्यापासून दूर असेल पवार कुटुंबाचा भगवा देखील राजकारणामध्ये येऊ पहात आहे. दसऱ्यानिमित्त राष्ट्रवादीचे कर्जत जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी कर्जत तालुक्यामधील खर्डा याठिकाणी असलेल्या शिवपट्टण किल्ल्यासमोर भारतामधील सर्वात उंच भगवा ध्वज उभारला आहे. ७४ मिटरचा हा ध्वज असून ९० किलो वजन आहे. मी भगव्याचे राजकारण करणारा नाही. मी फक्त विकासाचे राजकारण करणार, असं रोहित पवार आपल्या भाषणात म्हणाले. तसंच, ‘याची संकल्पना मांडत असताना मतदारसंघातील प्रत्येक लोकांनी ताकद आणि पाठबळ दिलं. हा विचार जेव्हा राज्याच्या कानाकोपऱ्यात गेला तेव्हा अनेकांनी पाठिंबा दिला. हे ध्वज राज्यातील अनेक ठिकाणी गेला पाहिजे. कारण, सामान्य कुटुंबातील लोकांना तिथे जाता येत नाही. त्यामुळे तिथली माती आहे, तिथे आणता येईल. यातून त्यांना प्रेरणा मिळेल. राज्याबाहेर सुद्धा हा ध्वज गेला आहे. तिथे सर्वांनी यांचं पूजन केलं. आज दसऱ्याच्या शुभ मुहुर्तावर हा ध्वज फडकला आहे. या मागचा एकच विचार आहे आणि तो म्हणजे, समतेचा आणि एकतेचा, असं रोहित पवार म्हणाले.
या ध्वजाच्या उभारणीसाठी राजकीय प्रतिनिधींसोबत धार्मिक अतिथी सुद्धा उपस्थित होते. तरुण उद्योजकांचा सहभाग यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. दसऱ्याच्या निमित्ताने मुंबईत शिवसेनेचा मेळावा तर पंकजा मुंडे हे भाजपाचा प्रसिद्ध करत असले तरी त्यांचा मिळवा हा भाजपाच मिळवा असल्याचं मानलं जातं. त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादीचाही दसरा मेळावा होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.