राजकारण

सचिन वाझेच्या सीआययू कार्यालयाची झडती; कपाटात हातोडा सापडल्याने ‘एनआयए’ चक्रावली

मुंबई : एखाद्या एन्काऊंटर स्पेशालिस्टकडे रिवॉल्वर अथवा काडतूस सापडले तर आश्चर्याची गोष्ट नाही. परंतु कोणत्या एन्काऊंटर स्पेशालिस्टकडे हातोडा सापडला तर तपास यंत्रणा चक्रावते. पडद्यामागे काही तरी मोठा डाव आहे या संशयाने तपास करते. मनसुख हिरेन हत्या आणि प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया बंगल्याबाहेर स्फोटकं ठेवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझेच्या हातोड्याची अशीच कहाणी समोर आली आहे.

सचिन वाझे सध्या अटकेत आहे. ‘एनआयए’ अंटालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्याकांडाचा तपास करत आहे. या तपासात ‘एनआयए’ विविध ठिकाणी धाडी टाकून महत्त्वाची कागदपत्रे आणि साहित्य पुरावा म्हणून जमा करत आहेत. यात एक हातोडाही सापडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, सचिन वाझेच्या मुंबई पोलीस मुख्यालयातील सीआययू केबिनमध्ये एका कपाटात हातोडा सापडला आहे. जेव्हा सचिन वाझे अटक झाले तेव्हा त्यांच्याकडून नोटा मोजण्याची मशीनही जप्त करण्यात आली.

सचिन वाझेविरोधात लाचलुचपत विभागानेही तपास सुरू केला आहे. सचिन वाझेच्या कार्यालयातील कपाटात सापडलेल्या हातोड्याचा वापर अंटालिया स्फोटक प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यासाठी केला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तपासात सचिन वाझेकडून अनेक लग्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या. या गाड्यांचे नंबरही बदलण्यात आले होते.

२५ फेब्रुवारी मुकेश अंबानी यांच्या अंटालिया बंगल्याबाहेर जी स्कोर्पिओ गाडी आढळली. त्या गाडीचा नंबर रस्त्यातच बदलला असल्याचं सीसीटीव्हीत कळालं. नंबर प्लेट बदलून नवीन नंबर प्लेट लावण्यासाठी कधीकधी हातोड्याची गरज भासते. सचिन वाझे या हातोड्याचा वापर नंबर प्लेट बदलण्यासाठी केलाय का? याबाबत एनआयएच्या चार्जशीटमधून खुलासा होऊ शकतो.

अंटालिया स्फोटक कार प्रकरण आणि व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या हत्येप्रकरणी एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख असलेला माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्माला १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्यासोबत आनंद जाधव व संतोष शेलार या दोघांनाही १२ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली, तर मनीष सोनी आणि सतीश मोटेकर यांच्या एनआयए कोठडीत १ जुलैपर्यंत वाढ करण्यात आली आहे. मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर संतोष शेलार व आनंद जाधव हे दिल्लीसह अन्य शहरांचा फेरफटका मारून आले होते, असे राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) तपासात समोर आले आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या या प्रवासाचा खर्च अन्य व्यक्तीने केला होता. ती व्यक्ती नेमकी कोण, याचा एनआयएकडून कसून तपास सुरू आहे, असेही सूत्रांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button