राजकारण

अमलीपदार्थांचा काळाबाजार रोखण्यासाठी राज्यात विशेष मोहीम : अनिल देशमुख

मुंबई : समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुंबईत सर्रास होणाऱ्या अमलीपदार्थांच्या व्यवहारांवर शुक्रवारी विधानसभेत सवाल उपस्थितीत केला. विधानसभेत अबू आझमी यांनी प्रश्नोत्तराच्या तासात मुंबईतील ड्रग्जचा होणारा काळाबाजार यावर प्रश्न उपस्थित केला. गैरप्रकारे होणाऱ्या ड्रग्ज व्यवहारांना थांबवण्यासाठी समर्थन देतांना विरोधक आमदारही अबू आझमींच्या पाठीशी उभे राहिले. यावेळी मुंबईत होणारा ड्रग्जचा गैर व्यवहार रोखण्यास आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी राज्यात एक मोहीम हाताळण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य सरकारकडून सांगितले.

विधानसभेत अबु आझमी यांनी ड्रग्जचा काळाबाजार रोखण्यासाठी महाराष्ट्र ड्रग्ज प्रकरणात लीड घेऊ शकतो का? असा प्रश्न उपस्थितीत केल्यानंतर या प्रश्नावर उत्तर देतांना गृहमंत्री म्हणाले, यासंदर्भात प्रत्येक पोलीस ठाणेनिहाय एक ड्राईव्ह घेण्यात येईल. यामध्ये फुड अँड ड्रग्ज डिपार्टमेंट, पोलीस विभाग, इंडस्ट्री डिपार्टमेंटसह नार्कोटिक विभागाच्या मदतीने संपूर्ण महाराष्ट्रात एक ड्राईव्ह घेण्यात येईल, असे सांगितले.

ड्रग्जचा होणारा गैर व्यवहार सुरू असल्याने प्रत्येक पोलिस ठाण्यात नशा प्रतिबंध करण्यासाठी स्वंतत्र विभाग असेल असे मागे सांगण्यात आले होते, याची आठवणही अबू आझमी यांनी सरकारला करून दिली. तर यासंदर्भात बोलताना गृहमंत्री म्हणाले, महाराष्ट्र पहिलं राज्य असेल की, जेथे पहिल्यांदाचं ड्रग्जच्या होणाऱ्या गैर व्यवहारास प्रतिबंध करण्यास अशा प्रकारचं ड्राईव्ह अर्थात मोहीम घेण्यात येईल. या ड्राईव्हच्या माध्यमातून ड्रग्जचा होणारा गैर व्यवहार रोखण्यास आणि त्याला प्रतिबंध करण्यासाठी योग्य ते पाऊलं महाराष्ट्र शासनाकडून उचलण्यात येईल अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button