इतर
सचिन वाझे निलंबित

मुंबई : मुकेश अंबानींच्या अँटेलिया बंगल्याशेजारी स्कॉर्पिओमध्ये स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर एपीआय सचिन वाझे (Sachin Vaze) यांना NIA कडून अटक करण्यात आली. कोणताही अधिकारी 48 तासांपेक्षा जास्त वेळ पोलीस कोठडीत असेल तर त्याचं निलंबन होतं.
त्यानुसार सचिन वाझे यांचं निलबंन झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी सचिन वाझे यांच्यावर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे. पण याबाबत पोलीस दलाकडून अद्याप औपचारीकपणे माहिती जारी करण्यात आलेली नाही.
सचिन वाझे यांना कोर्टातून NIA कार्यालयात आणण्यात आलं, वाझे यांची NIA कार्यालयात पुढचे 11 दिवस चौकशी होणार आहे. त्यांचे सहकारी रियाज काझी यांची गेल्या साडेचार तासांपासून NIA कडून चौकशी सुरु आहे