Top Newsआरोग्य

महाराष्ट्रात निर्बंध शिथिल; आजपासून नवी नियमावली

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. १ फेब्रुवारीपासून नवीन नियमावली लागू होणार आहे. अपेक्षेनुसार, निर्बंधामध्ये सूट देण्यात आली आहे. पण सूट देण्यात आलेल्या ठिकाणी जायचे असेल तर लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे.

ओमायक्रॉनची लाट नियंत्रणात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय सोमवारी राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मंगळवारपासून सर्व पर्यटनस्थळे, राष्ट्रीय उद्याने, सफारी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्नसोहळे व अन्य सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी आता क्षमतेच्या २५ टक्के किंवा जास्तीत जास्त २०० लोकांच्या उपस्थितीत करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्काराठी २० व्यक्तींची मर्यादा हटविण्यात आली असून आता कितीही लोकांना उपस्थित राहता येईल. अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने, उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने. मनोरंजनात्मक कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने, खुल्या मैदानात किंवा सभागृहात क्षमतेच्या २५ टक्के किंवा २०० लोकांना प्रवेश देण्यात आला आहे.

नवीन नियमावली

– नॅशनल पार्क आणि जंगल सफारी आधीप्रमाणे नियमीत वेळवर सुरु होतील. येथे भेट देणाऱ्या सर्व पर्यटकांचे लसीकरण पूर्ण झालेले असावे. तसेच मास्कही वापरण्यात यावा. दोन्ही ठिकाणी भेट देण्यासाठी ऑनलाईन तिकिट बूक करावे लागेल.
– सर्व पर्यटनस्थळे नियमीत वेळेवर सुरु होतील. ऑनलाईन तिकिट खरेदी करावे लागेल. तसेच पर्यटनस्थळावर फिरायला जाणाऱ्याचे लसीकरण झालेलं असावे.
– स्पा, ब्युटी पार्लर आणि सलूनमध्ये ५० टक्के उपस्थिती असावी.
– अंत्ययात्रामध्ये उपस्थितीवर मर्यादा ठेवण्यात आल्या नाहीत. किती लोक उपस्थित राहू शकतात.
– उपहारगृह, नाट्यगृह, चित्रपटगृह स्थानिक प्राधिकरणाने निर्धारित केलेल्या वेळेत ५० टक्के क्षमतेने.
– अम्युझमेंट पार्क, थिमपार्क, जलतरण तलाव, वॉटर पार्क ५० टक्के क्षमतेने सुरु होतील.
– हॉटेल, रेस्टॉरंट आणि नाट्यगृहांची वेळ स्थानिक प्रशासन ठरवणार

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button