Top Newsफोकस

मुंबईतील मालाडमध्ये इमारत कोसळून ११ जणांचा दु्र्देवी मृत्यू, ८ जण गंभीर

मुंबई : मुंबईतील मालाड पश्चिमेकडील मालवणी भागात चार मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला, ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहे. दुर्घटनास्थळी मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून अद्याप मदत आणि बचावकार्य सुरु आहे. मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली.

ही दुर्घटना घडली, त्यावेळी काही मुलांसह अनेक लोक या इमारतीमध्ये होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्नीशमन दलाचे जवान आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने इमारतीच्या ढिगाऱ्याखली अडकलेल्या १५ हून अधिक लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच, आसपासच्या तीन इमारतीही खबरदारी म्हणून रिकाम्या करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मालाडमधील मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात बुधवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली. इमारत अचानक कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला. तर ८ जण गंभीर जखमी झाले असून त्यांना बीडीबीए रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दुर्घटना घडली तिथे जवळच एक तळ अधिक तीन मजल्यांची धोकादायक स्थितीतील इमारत असून त्यात काही कुटुंबांचे वास्तव्य आहे. खबरदारी म्हणून ही पूर्ण इमारत रिकामी करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या इमारतीतील रहिवाशांना अन्यत्र हलवण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आल्याचे अग्निशमन दलाच्या वतीने सांगण्यात आले. मुंबई महापालिकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहेत. ही सर्व बांधकामे कलेक्टर लँडवर असल्याचेही सांगण्यात येत आहे.

दरम्यान, मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे इमारत कोसळली. बचावकार्य सुरू आहे. जखमी लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अन्य कोणी अडकले आहे का? याचा शोध घेतला जात आहे, असे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. तर मुंबईत बुधवारीपासून मान्सूनचे आगमन झाले. पावसाच्या तडाख्यात मुंबईतील अनेक भाग जलमय झाले होते. उपनगरात पावसाचा जोर अधिक होता.

मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री ११ वाजता ही दुर्घटना घडली. मालाड पूर्व या ठिकाणी मालवणी गेट क्र. ८ येथे अब्दुल हमीद मार्गावर न्यू कलेक्टर कंपाऊंड परिसरात एका ३ मजली इमारतीचा दुसरा व तिसरा मजला बाजूला असलेल्या १ मजली चाळीवर कोसळला. त्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ११ जणांचा जागीच मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button