राजकारण

शरद पवारांमुळेच आरक्षण मिळाले नाही : चंद्रकांत पाटील

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळेच मराठा आरक्षण मिळालं नाही हे आमदार गोपीचंद पडाळकर यांचं म्हणणं योग्यच आहे. शरद पवार हे सगळ्याचे गॉडफादर आहेत. ठाकरे सरकारचे ते मार्गदर्शक आहेत. मराठा आरक्षणप्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल वाचल्यावर किती दिरंगाई झाली ते समजतं, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुण्यात अनाथ मुलांना साहित्य वाटप करण्यात आलं. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते.

चंद्रकांत पाटील म्हणाले, गोपीचंद पडळकरांनी काही भूमिका मांडली आहे. पवार सगळ्यांचे गॅाडफादर आहेत. तसं म्हटल्यानंतर त्यांच्यावर दोष जातो. माझी डिबेट करायची तयारी आहे. मी निकाल वाचला. त्यात पावला-पावलावर जाणवतंय की चुका आहेत. ॲार्डिनन्सचा कायदा केला नाही.

कोणाच्याही ध्यानीमनी नसताना ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडेंचे निधन झाले. आज ७ वर्षे झाली. दुपारी डाक विभाग त्यांच्यावर एक एन्व्हलप करत आहे. सतत संघर्ष हे त्यांचे ध्येय होते. कार्यालयातली पार्टी त्यांनी रस्त्यावर आणली. भाजपचा संघर्ष कधीच संपणार नाही, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

भेटीगाठी अनेक कारणांनी सुरु आहेत. शरद पवार आजारी आहेत, त्यामुळे त्यांच्या प्रकृतीची चौकशी करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. भाजप खासदार रक्षा खडसेंचीही भेट त्यांनी घेतली. दुश्मन जरी असला तरी भेट घेणं ही संस्कृती आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button