Top Newsराजकारण

पश्चिम बंगालचे नाव बदला; ममता बॅनर्जींची मोदींकडे अजब मागणी

नवी दिल्ली : एकमेकांमध्ये विस्तवही न जाणाऱ्या देशातील दोन बड्या नेत्यांची आज दिल्लीत भेट झाली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी एकमेकांवर टोकाची टीका केली होती. त्यानंतर आज मोदी-ममतांची भेट झाली.

जवळपास अर्धा तास दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, ही केवळ औपचारिक भेट होती. या भेटीत मी कोव्हिड आणि राज्यातील कोरोना लसी आणि औषधांचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पश्चिम बंगालच्या नामांतराचा मुद्दाही मी मांडला. या मुद्द्यावर “मी बघतो” असं मोदींनी सांगितलं.

पश्चिम बंगालमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. त्याआधी ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यामध्ये काँग्रेस नेते कमलनाथ, आनंद शर्मा यांचा समावेश होता. सूत्रांच्या मते, ममता बॅनर्जी या राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचीही भेट घेणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button