आरोग्य

आरटीपीसीआर चाचणीच्या दरात कपात; किमान दर ३५० रुपये

मुंबई : ओमिक्रॉनचा संभाव्य धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने आरटीपीसीआर चाचण्यांचे दर आखणीन कमी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे आरटीपीसीआरचा किमान दर ३५० रुपये असेल, तर रुग्णाच्या घरी जाऊन नमुना घेतल्यास ७०० रुपये अकारावे लागतील. सार्वजनिक आरोग्य विभागाने हे दर निश्चित केले आहेत. भारतीय आयुर्विज्ञान संस्था आणि एनबीएल मान्यताप्राप्त खासगी कोविड प्रयोगशाळांमधील कोविड चाचणीसाठी असलेल्या आररटीपीसीआर चाचण्यांचे दर निश्चित करण्यासाठी राज्य सरकारने समिती स्थापन केली होती.

या समितीने मार्चमध्ये कोविड चाचण्यांचे दर निश्चित केले होते. त्यानुसार घरी लॅबममध्ये आरटीपीसीआर चाचणीचा दर ५०० रुपये तर घऱी जाऊन नमुना घेतल्यास ८०० रुपये दर निश्चित केला होता. खासगी प्रयोगशाळांसाठी हा दर बंधनकारक केला होता. मात्र मिशन बिगिन अगेन अंतर्गत औषध निर्माण कंपन्या, वाहतूक सेवाही सुरु झाली आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्चही कमी झाला आहे. परिणामी खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचण्यांसाठी येणारा खर्चही कमी झाल्याचे राज्य सरकारच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे आरटीपीसीआर चाचण्यांचे दर सुधारित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यानुसार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने आरटीपीसीआर आणि प्रतिपिंड चाचण्यांचे दर कमी केले आहेत.

पूर्वीचे दर आणि आताचे नवीन दर लॅबमध्ये नमुना घेतल्यास पूर्वीचा दर ५०० रुपये होता आता चाचणीचा नवीन दर ३५० रुपये, कोविड केअर सेंटर, रुग्णालय, क्वारंटाईन सेंटरमधून रुग्णाचा नमुना घेतल्यास पूर्वीचा दर ६०० रुपये आता याच चाचणीचा नवीन दर ५०० रुपये, रुग्णाच्या घऱी जाऊन नमुना घेतल्यास पूर्वीचा दर ८०० रुपये आता नवीन दर ७०० रुपये, रॅपिड अँटीजन टेस्ट फाँर सार्स कोविड टू- १०० रुपये, रुग्णाच्या घरी जाऊन केल्यास २५० रुपये, एलायसा फाँर सास्र कोविड टू अँटीबाँडीज २०० रुपये , रुग्णाच्या घऱी जाऊन केल्यास ३५० रुपये आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button